अकोला दिव्य न्यूज : मराठा पाटील संघटनेचा उपक्रम मराठा पाटील संघटना बाळापुरतर्फे घेण्यात आलेले हृदयरोग निदान शिबिर नागरिकांना जीवनदान ठरणारे आहे. संघटनेचे कार्य परोपकारी असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. गोपाळ महाराज उरळकर यांनी केले. सर्व जाती-धर्मातील नागरिकांसाठी आयोजित शिबिरात 120 रुग्णांची तपासणी केली. शिबिरात नऊ रुग्णांना एन्जिओग्राफी तर तीन रुग्णांना एन्जिओप्लास्टी करण्यासाठी डॉक्टरांनी सांगितले. या सर्व रुग्णांचा विनामूल्य उपचार अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल मार्डी अमरावती येथे करण्यात येणार आहे.

अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल अमरावती व मराठा पाटील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र उरळ हृदयरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटक म्हणून ह.भ.प गोपाळ महाराज उरळकर तर प्रमुख अतिथी म्हणून संदीप पाटील, रेखाताई राऊत, संजय राऊत आणि अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी दिगंबर उपस्थित होते.
हॉस्पिटलचे डॉ.अनुप डोंगरे, डॉ.पुनम जयस्वाल, डॉ.शुभम बादुकले, समाजसेविका प्रज्ञा मनवर, प्राजक्ता वाडेकर, रवीना मोहोळ, वैष्णवी गोडाणे, निशा जामूनकर, प्रतीक्षा वाघमारे, प्रिया छापाने, विशाखा खैरे, कपिलदेव वर्मा, सागर धर्माळे, मुकेश ठाकूर यांनी तपासणी केली. प्राथमिक आरोग्य केंद्र उरळचे वैद्यकीय अधिकारी डॉ.दरोकर, डॉ शुभांगी घुगे, डॉ चेतना केळकर, डॉ सिद्धांत इंगळे यांनी सहकार्य केले.
याप्रसंगी मंचितराव पोहरे, प्राध्यापक बाळासाहेब पोहरे, चंद्रकांत माळी, धनंजय नेमाडे, पद्माकर माळी, रवींद्र पोहरे, हिम्मतराव मिटांगे, पुरुषोत्तम पाटील, शिवाजीराव म्हैसणे, गोपाल पोहरे, शशिकांत नकासकर, विठ्ठल नळकांडे, अशोक नळकांडे, दीपक पाटील, विठ्ठल पाटील, प्रशांत पाटील, ज्ञानेश्वर माळी, रुपेश पोहरे, गणेश मुरूमकार, प्रशांत पांडुरंग पोहरे, मोहन विरोकार, देविदास वाघ, अनंत कुमार पोहरे, रवींद्र नेमाडे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सहसचिव वसंतराव पोहरे तर आभार मराठा पाटील संघटनेचे अध्यक्ष शरद वानखडे यांनी मानले.
