अकोला दिव्य न्यूज : नागपूरमध्ये सरकारी कंत्राटदार पीव्ही वर्मा यांच्या आत्महत्येचे गूढ उकलत आहे. या प्रकरणात पुसद अर्बन बँकेचा अध्यक्ष शरद मैंदला अटक करण्यात आली होती.पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने MCR केला असता, दुसऱ्या तक्रारीवरून मैंदला अटक केली.तर या प्रकरणात शरद मैंद याच्यासोबत गुंड मंजित वाडे याला अटक केली. सध्या दोघेही पोलीस कोठडीची हवा खात आहे.दरम्यान पोलिस तपासामध्ये शासकीय कंत्राटदार राधेश्याम बियाणीचे नाव समोर आले आहे. पोलिसांनी बियाणीला अटक केली. न्यायालयाने १४ ऑक्टोबरपर्यंत PCR दिला होता. आज न्यायालयात बियाणीला हजर करून पोलिस यंत्रणा पोलिस कोठडीची मागणी करणार सूत्रांनी असल्याचे सांगितले.

काही महिन्यांपूर्वी, चंद्रपूर पोलिसांनी बियाणीला वर्मा यांच्या नावावर असलेल्या एसयूव्हीमध्ये एका महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतले होते. पीडित महिलेने दुर्गापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.बियाणीवर बलात्काराचा गुन्हा दाखल असून, वर्मा यांच्या आत्महत्येमागे बियाणीचा हात असल्याचा संशय आहे. वर्मा यांच्या मालमत्तेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न आणि आर्थिक व्यवहार यातून मोठे षडयंत्र उघडकीस येत आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
कंत्राटदार व्यंकटेश्वरा वर्मा यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या कंत्राटदार राधेश्याम बियाणी यांच्याकडून वर्मा यांच्या वस्तू जप्त करण्यात आल्या असून, त्यांच्या जबाबातील विसंगतीमुळे गुन्हे शाखा पोलिसांनी त्यांना अटक केली. नागपूरमध्ये सरकारी कंत्राटदार पीव्ही वर्मा यांच्या आत्महत्येमागे बियाणीचा हात असल्याचा संशय आहे. वर्मा यांच्या मालमत्तेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न आणि आर्थिक व्यवहार यातून मोठे षडयंत्र रचले गेले असल्याचे घडकीस येत आहे. नागपूर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून पुसद बँकेच्या आर्थिक गैरव्यवहाराची माहिती लवकरच सक्तवसुली संचालनालयाला (ED) दिली जाणार आहे.
