Monday, November 3, 2025
No menu items!
No menu items!
Homeअकोल्याचे डॉ.अनुप कोठारींवर सोन साखळी लुटारूंचा हमला ! सुदैवाने बचावले

अकोल्याचे डॉ.अनुप कोठारींवर सोन साखळी लुटारूंचा हमला ! सुदैवाने बचावले

अकोला दिव्य न्यूज : अकोला शहरातील नामांकित बालरोग तज्ज्ञ डॉ.अनुप कोठारी यांच्यावर काल रविवार १२ ऑक्टोबर रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी हल्ला चढवून त्यांच्या गळ्यातील सोन साखळी लुटण्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि रात्रीला घातल्या जाणाऱ्या गस्तीवर प्रश्न निर्माण झाले आहे.

स्थानिक विघानगर भागात राहणारे डॉ.‌कोठारी नित्यक्रमानुसार जेवणं झाल्यावर काल रविवारी रात्री आपल्या राहत्या घरापासून वाकींग करीत गोरक्षण रोड येथील चार बंगल्यापर्यंत पोहचले आणि येथून वाकींग करीत परत आपल्या घराकडे निघाले. दरम्यान गोरक्षण संस्थान जवळ आले असता, एक बाईक येऊन थांबली आणि बाईकवरील एका युवकाने त्याचे मनगट पकडले.

अचानक झालेल्या या प्रकारानंतरही घाबरून न जाता डॉ. कोठारी यांनी त्याला यासाठी विचारणा केली असताना बाइकवर असलेल्या दुसऱ्या तरूणाने त्यांच्या तोंडावर मुष्टी प्रहार करीत, तोंड दाबून गळ्यातील सोन्याची साखळी (चेन) ओढली. त्यामुळे चेन तुटली पण कोठारी यांनी मजबूतपणे हातात धरून ठेवलीआणि नेमके त्याचवेळी रस्त्यावर असलेल्या लोकांनी एकच कल्ला करताच, कोठारी यांना सोडून देऊन मोटारसायकल स्वार पळून गेले. अन्यथा कोठारींना अजून मारझोड करीत, सोन साखळी लुटून नेली असती.अशाच प्रकार याच रस्त्या काही विद्यार्थ्यांसोबतही झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

अकोला शहरातील सोनसाखळी चोरांचा चोख बंदोबस्त करण्यात पोलिस प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. ही घटना खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, गोरक्षण रोड सारख्या भागात घडलेल्या या घटनेने वाकींग करणा-याचा जानमालच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!