अकोला दिव्य न्यूज : बँकांकडे सादर केले जाणारे धनादेश काही तासांत संबंधित लाभार्थीच्या बँकखात्यात वळते करण्याची रिझर्व्ह बँकेची योजना तांत्रिक अडचणींच्या फेऱ्यात अडकली आहे. रिझर्व्ह बँकेने ४ ऑक्टोबरपासून ही सुविधा अमलात आणण्याचे निर्देश बँकांना दिले असले तरी, आज आठवड्याभरात बहुतांश बँकांमध्ये धनादेश वटण्यासाठी दोन दिवसांचा वेळ लागत आहे. काही बँकांनी तर यासंदर्भात आपल्या ग्राहकांना लघुसंदेशही पाठवले आहेत.

धनादेश वटणावळीसाठी सध्या ‘सीटीएस’ अर्थात ‘चेक ट्रंकेशन सिस्टिम’ प्रणाली बँकिंग व्यवस्थेत वापरण्यात येते. या प्रचलित प्रणालीची कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि बँक ग्राहकांची व्यवहार पूर्ततेची जोखीम (सेटलमेंट रिस्क) कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकने
रिझर्व्ह बँकेचा निर्णय अमलात येऊन आठवडा लोटूनही धनादेश वटण्यास विलंब होत आहे.
वापरण्यात येते. या प्रचलित प्रणालीची कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि बँक ग्राहकांची व्यवहार पूर्ततेची जोखीम (सेटलमेंट रिस्क) कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकने ‘सेटलमेंट ऑन रियलायझेशन’ म्हणजेच आधी वसुली नंतर पूर्तता हा बदल अमलात आणला. याबाबत गेल्या महिन्यात घोषणा करण्यात आल्यानंतर चार ऑक्टोबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. प्रत्यक्षात मात्र अजूनही धनादेश वटण्यासाठी एक ते दोन दिवस लागत आहेत.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात ‘एनपीसीआय’कडून बँकांसाठी देयक प्रणाली राबवली जाते. मात्र बँकांकडील सॉफ्टवेअर प्रणाली आणि एनपीसीआयची देयक प्रणाली यांच्या एकात्मीकरणात (इन्टिग्रेशन) समस्या येत आहे. या तांत्रिक समस्येमुळे, आउटवर्ड क्लिअरिंगचे हजारोंनी धनादेशांवरील प्रक्रिया प्रलंबित आहे, असे खासगी बँकेतील अधिकाऱ्याने सूचित केले.
तयारी आधीच अमलबजावणी ? : रिझर्व्ह बँकेची चेक क्लिअरींग अंमलबजावणी जानेवारी २०२६ पासून अपेक्षित होती. मात्र मध्यवर्ती बँकेने ४ ऑक्टोबरपासून प्रणाली लागू केल्याने बँकिंग प्रणालीवर दबाव निर्माण झाला आहे. अनेक बँक शाखांमध्ये मनुष्यबळाची कमतरता आणि कर्मचाऱ्यांना पुरेसे प्रशिक्षण दिले नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी चेक क्लिअरिंगसाठी लागणाऱ्या स्कॅनरसारख्या पायाभूत सुविधा देखील अपुऱ्या आहेत. प्रस्तुत प्रतिनिधीने स्वतः सहकारी क्षेत्रातील एका बँकेत धनादेश क्लिअरिंग दिल्यानंतर या शाखेत सध्याही त्वरित वटणावळीची सुविधा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर शाखेत पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे कारण देण्यात आले.
बँकेच्या कर्मचाऱ्यांवर सध्याच्या धनादेश वटणावळीच्या नवीन प्रणालीमुळे प्रचंड ताण आला असून, १२ तासांपेक्षा अधिक आणि रात्री उशिरापर्यंत काम करावे लागते आहे. रिझर्व्ह बँकेने पुरेसे प्रशिक्षण न देता थेट निर्देश दिल्याने प्रत्यक्ष प्रणाली वापरताना बँका आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अनेक बँकांमध्ये धनादेशचे आउटवर्ड क्लिअरिंग सकाळी चारपर्यंत सुरू आहे. शिवाय ज्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कामकाज केले जात आहे, त्यामध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत. एका दिवसांत हजारो धनादेशांचे स्कॅनिंग करण्यासाठी वेळ अपुरा पडत आहे.
विलब का? • सुधारित प्रणालीबाबत प्रशिक्षणाचा अभाव
• पायाभूत सुविधांची कमतरता
• बँकांना प्रणाली अद्ययावत करण्यासाठी अल्प कालावधी • घाईघाईने स्कॅनिंगमुळे, अस्पष्ट आणि अपूर्ण धनादेशाच्या छायाचित्राने चुका
• सहकारी बँकांकडून संदेश
सहकारी बँकांनी धनादेश वटणावळीसाठी तांत्रिक समस्येमुळे विलंब होत असल्याचे संदेश ग्राहकांना पाठवले आहेत. गैरसोयीबद्दल खेद व्यक्त करत त्यांनी निधी हस्तांतरणासाठी एनईएफटी, आरटीजीएस, यूपीआय, नेट/मोबाइल बैंकिंग-सारख्या पर्यायी डिजिटल पद्धतीचा वापर करण्याचे सुचविले आहे.
