Monday, November 3, 2025
No menu items!
No menu items!
Homeअकोल्याच्या 'मंगेश'ने धावत्या ट्रेनमधून प्रवाशाला खाली फेकले ! तरुणाचा मृत्यू

अकोल्याच्या ‘मंगेश’ने धावत्या ट्रेनमधून प्रवाशाला खाली फेकले ! तरुणाचा मृत्यू

अकोला दिव्य न्यूज : भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेसमध्ये धक्कादायक घटना घडली असून क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादानंतर पुण्यातील तरुणाला अकोला येथील प्रवाशाने ट्रेनमधून खाली फेकून दिले. या घटनेत खाली फेकण्यात आलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. धावत्या ट्रेनमध्ये घडलेल्या या घटनेने प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास मुंबईच्या दिशेने निघालेल्या कोणार्क एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये किरकोळ वाद झाला. या वादामध्ये २० वर्षीय तरुणाला ट्रेनमधून खाली फेकण्यात आले. यावेळी, गंभीर जखमी झाल्याने धावत्या ट्रेनमधून फेकण्यात आलेल्या तरुणाचा मृत्यू झाला असून आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

पुणे येथील विनोद कांबळे आणि अकोला येथील मंगेश दसोरे हे भुवनेश्वर-मुंबई या कोणार्क एक्स्प्रेस गाडीने प्रवास करत होते. यावेळेस, विनोद आणि त्याचा मित्र गणेश हे दोघे मुंबईतील हाजिअलीच्या दर्शनासाठी मुंबईकडे निघाले होते. याचदरम्यान, मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास ही एक्स्प्रेस कर्जतच्या जवळ पोहचली असताना एक्स्प्रेसच्या डब्ब्यामध्ये दरवाजाच्या बाजूला बसण्यावरून विनोद आणि अकोल्यातील मंगेश यांच्यात वाद झाला होता.

सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली, मात्र नंतर मंगेशने रागाच्या भरात विनोद याला लाथ मारल्याने तो कर्जत ते भिवपुरीदरम्यान धावत्या ट्रेनमधून खाली फेकला गेला होता. यावेळेस, ट्रेनमधून खाली पडून गंभीर जखमी झालेल्या विनोद याला कर्जत येथील रुग्णालयात नेण्यात आले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी आरोपी मंगेश दसोरे याला ठाणे रेल्वे स्थानकातून ताब्यात घेण्यात आले असून याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!