अकोला दिव्य न्यूज : चित्रपट महर्षी व्ही. शांताराम यांच्या पत्नी आणि मराठी चित्रपटसृष्टीमधील आयकॉनिक सिनेमा म्हणून अजरामर असलेल्या ‘पिंजरा’ सिनेमातील अभिनेत्री संध्या शांताराम आज काळाच्या पडद्याआड गेल्या. त्यांच्या निधनावर चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून संध्या यांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत. पिंजरा हा त्यांचा गाजलेला चित्रपट होता. तसंच संध्या यांनी झनक झनक पायल बाजे, नवरंग या आणि अशा अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती.

टपोरे डोळे आणि चेहऱ्यावरचे हावभाव यातून बोलणाऱ्या संध्या यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. व्ही. शांताराम यांच्या दिग्दर्शनात त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले. अरे जा हरे नटखट या गाण्यात त्यांनी पुरुष आणि स्त्री अशी वेशभुषा करुन नाच करत सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केलं होतं. अशा हरहुन्नरी अभिनेत्रीची प्राणज्योत मालवली आहे.
पिंजरा या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचं कौतुक झालं होतं. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या अप्रतिम अभिनय आणि नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मानावर एक वेगळी छाप पाडली. ‘झनक झनक पायल बाजे’, ‘दो आंखें बारह हाथ’ आणि विशेषत: ‘पिंजरा’ चित्रपटामधील त्यांची अजरामर भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायम स्मरणात राहील.
नवरंग चित्रपटातील गाणी आणि अभिनय वाखाणण्याजोगा
१९५९ मध्ये प्रदर्शित झालेल्या व्ही. शांताराम यांच्या ‘नवरंग’ या चित्रपटातून अभिनेत्री संध्या शांताराम यांनी आपल्या अप्रतिम अभिनय आणि नृत्यकौशल्याने प्रेक्षकांना चकित केले. “अरे जा रे हट नटखट” हे त्यांच्यावर चित्रित झालेले गाणे आजही तेवढेच लोकप्रिय आहे. संध्या शांताराम यांचे मूळ नाव विजया देशमुख होते. या गाण्यासाठी त्यांनी खास शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घेतले होते. त्यावेळी कोणतेही नृत्यदिग्दर्शक नसल्याने, गाण्यात दिसणाऱ्या सर्व स्टेप्स संध्या यांनी स्वतः किंवा दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी तयार केल्या होत्या.
मराठी चित्रपटसृष्टीमधील आयकॉनिक सिनेमा म्हणून ‘पिंजरा’ ओळखला जातो. या सिनेमातील बहारदार नृत्याने अभिनेत्री संध्या शांताराम यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. शाळेतील शिक्षक आणि तमाशा फडातील एक नर्तकी यांच्यातील अनोख्या प्रेमकथेवर हा सिनेमा आधारिती होता. या चित्रपटातील संध्या यांची भूमिका विशेष गाजली होती. त्यानंतर त्यांनी ‘दो आंखें बारह हाथ’, ‘झनक झनक पायल बाजे’ आणि ‘जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ सारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या. मात्र, ‘पिंजरा’ या चित्रपटातील त्यांची भूमिका सर्वाधिक
