अकोला दिव्य न्यूज : संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या वर्मा आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केलेले पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांचा एक-एक पराक्रम आता समोर येत आहे. नागपूर गुन्हे शाखा पोलिसांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता मैंदला अटक केल्यानंतर, बॅकेचे अध्यक्ष मैंद याने गैर कायदेशीररित्या अनेक कर्जदारांची मालमत्ता हिरावून घेतल्याचे उघडकीस आले.

अकोल्यातील तरूण व्यवसायीकाची गहाण मालमत्ता टीडीआरने मंजूर केलेल्या अपसेट प्राईज पेक्षा कमी किंमतीत निलाम करून कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केली. विशेष म्हणजे निलामीत ही मालमत्ता बॅकेचा संचालक नातेवाईकांना विकली गेली आहे.
शेगांव येथील व्यवसायीक शंकरलाल भुतडा यांनी बॅकेकडून कुठल्याही प्रकारचे कर्ज घेतले नाही किंवा जमानतदार देखील नसताना बॅंकेने संगनमत करून एका कर्ज प्रकरणात भुतडा यांचा मालकीहक्क डावलून आणि न्यायालयाचे मनाई हुकूमअसतानाही बॅंकेने ती शेतजमीन तारण म्हणून घेतली.महत्वाचे म्हणजे भुतडा यांनी याबाबत बॅकेला व सर्व संबंधितांना २५ एप्रिल २०१६ रोजी सर्वाधिक खप असलेल्या दोन दैनिकात अँड. के.वी.मिश्रा स्वाक्षरीने जाहीरात प्रकाशित करून माहिती वजा जाहीर सुचना दिली होती.

एवढेच नव्हे तर न्यायालयाच्या आदेशासह आवश्यक कागदपत्रांसह पुसद अर्बन बँकेच्या शेगांव शाखेचे शाखाधिकारी आणि खामगांव शाखाधिकारी व प्राधिकृत अधिकारी, बॅकेचे अध्यक्ष व मुख्य संचालक मंडळाला पत्र देऊन, प्रत्यक्ष भेट देऊन विस्तृत माहिती दिली.
शेगाव येथील शंकरलाल भुतडा यांनी डिगांबर भिकाजी पुरी याला स्वतःच्या शेत विक्रीचे खरेदीखत नोंदवून दिले होते. मात्र या व्यवहारात पुरीने दिलेले धनादेश अनादरीत झाले. तेव्हा भुतडा यांनी खरेदीखत रद्द करण्याचा दावा कोर्टात दाखल केला. कायद्याने दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर, खामगांव यांच्या आदेशानुसार स्पेशल दिवाणी मुकदमा क्र.४३/२०१५ चा निर्णय दि.२ सप्टेंबर २०२२ रोजी देऊन त्यांनी दि.७ जानेवारी २०१५ रोजी करुन दिलेले खरेदीखत रद्दबादल (Cancelled) ठरविले. म्हणजेच भुतडा यांनी डिगांबर भिकाजी पुरी यांना करुन दिलेले खरेदीखताचे मुल्य शुन्य झाले. न्यायाधीशांचा निर्णयाप्रमाणे वरील मालमत्ता भुतडा यांच्या मालकीची व ताब्यात आहे. या अनुषंगाने या विषयाची नोंद ७/१२ वर झालेली आहे.

सदर मालमत्ता भुतडा यांच्या मालकी व ताब्यातील असल्याची बाब बॅकेचा लक्षात आणून देत, न्यायालयानचे आदेश दिल्यानंतरही बँकेकडून स्थावर मालमत्तेचा सांकेतिक ताबा व जाहिर लिलाव गैरकायदेशीर तर आहेच, यासोबतच न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना सुध्दा आहे. प्राधिकृत अधिकारी/शाखा अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तज्ञसंचालक, वसुली अधिकारी, फायनान्स मॅनेजर, बँकेचे कर्मचारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळ यांचाकडून हेतुपुरस्सर व सहाय्यक निबंधकाला हाताशी धरून भुतडा यांच्या कोट्यावधी रुपयांची मालमत्ता हडपण्याचा घाट घातला जात आहे.हे दिसून येते.

एका तरूणाला गळफास लावून मृत्यू पत्करायला विवश करेपर्यंत छळ करणाऱ्या पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष आणि संचालकाची एवढी हिम्मत कशी होतंय की, न्यायालयाने दि.२/९/२०२२ रोजी दिलेल्या आदेशानंतरही न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना करीत बँकेचे अधिकारी व कर्मचारी, संचालक मंडळ उघडपणे सर्वकाही गैर कायदेशीर कारवाई करण्याचे धाडस कोणाच्या पाठबळावर करीत आहेत. राजकीय पाठबळ आणि सहायक निबंधक व पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नाही.जर कर्जदारांची अशाप्रकारे आर्थिक फसवणूक केली जात असेल आणि न्यायसंबंधाने जे काही आदेश दिले जात असूनही अवमानना होत असेल तर सामुहिकरित्या जबाबदारी म्हणून सगळ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करणे गरजेचे आहे.
