अकोला दिव्य न्यूज : सार्वजनिक बांधकाम विभागाचे कंत्राटदार पी.व्ही. वर्मा उर्फ मुन्ना वर्मा यांच्या आत्महत्येप्रकरणी पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांना पुसद येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. नागपूर गुन्हे शाखेचे पोलिस पथकाने शरद मैंड यांचा पीसीआर मिळवून प्रकरणाचा अधिक तपास करीत असल्याने या प्रकरणात अधिक धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

नागपूरमधील कंत्राटदार मुन्ना वर्मा यांनी आर्थिक अडचणींमुळे त्रस्त होऊन नागपूरच्या राजनगर येथील त्यांच्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर संपूर्ण विदर्भात एकच खळबळ उडाली होती. तपासादरम्यान पोलिसांना असे आढळून आले की वर्मा विविध सरकारी खात्यांमध्ये काम करत होते. या कामासाठी सरकारकू त्यांना ३० ते ४० कोटी रुपये घेणे होते. यामुळे या आत्महत्येचा अनुषंगाने शासकीय कंत्राटदार व संघटनांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. तर सरकारी कामासाठी बाजारातूनही वर्मा यांनी कर्ज घेतले होते. मित्र व जवळच्या सहकाऱ्यांच्या मते, हे कर्ज फेडण्यास असमर्थतेमुळे ते तणावाखाली होते.
पुसद बँकेचे अध्यक्ष मैड यांनी कर्ज दिले होते
कर्जाच्या दबावाखाली तर मुन्ना वर्माने आत्महत्या केली का ? या दृष्टिकोनातून पोलिसांनी तपास केला. तेव्हा त्यांनी त्यांचा तपास वाढविल्याने या तपासादरम्यान असे आढळून आले की मुन्ना वर्माने पुसद अर्बन बँकेच्या अध्यक्ष मैंद कडून ३० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. सूत्रांचे म्हणणे आहे की शरद मैंदने ३० कोटी रुपयांचे कर्ज पुसद अर्बन बँकेकडून नाही तर त्यांच्या पत्नीच्या नावावर चालणाऱ्या एका पत संस्थेतर्फे दिले होते.

३० कोटी ऐवजी ६० कोटी रुपये दिले पण कर्ज अजूनही आहे
या प्रकरणात उच्चस्तरीय सूत्रांनी माहिती दिली, तपासात निष्पन्न झाले की शरद मैंद केवळ आधार कार्ड, पॅन कार्ड आणि स्टॅम्प पेपरच्या आधारे लोकांना पैसे देत आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की मुन्ना वर्मा यांनी हॉट मिक्स प्लांटसाठी कर्ज घेतले होते. कर्जाच्या रकमेपैकी ६० कोटी रुपये (मुळ ३० कोटी रुपये) दिले होते. तथापि, शरद मैंद सातत्याने पैशांची मागणी करत राहिले. अखेर निराश होऊन मुन्ना वर्मा यांनी आत्महत्या केली.
तपासादरम्यान, पोलिसांना असे आढळून आले की मुन्ना वर्माने त्याने घेतलेल्या ३० कोटी रुपयांच्या कर्जाचे व्याजासह ६० कोटी रुपये परत केले होते. तथापि, त्याच्याकडे अजूनही ३० कोटी रुपयांचे कर्ज बाकी होते, जे खूप त्रासदायक होऊ लागल्याने हतबल होऊन मुन्ना वर्मा यांनी आत्महत्या केली.
सूत्रांनी सांगितले की, शरद मैद फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड आणि स्टॅम्प पेपरच्या आधारे कोट्यवधी रुपयांचे कर्ज देत असे. शरद मैदने पुसद अर्बन बँकेत जमा केलेल्या मोठ्या रकमेचा गैरवापर केला होता. तो एका वित्तीय संस्थेमार्फत लोकांना कर्ज देत होता.तो वादग्रस्त जमीन स्वतःच्या नावावर करून कर्जही द्यायचा. सूत्रांचे म्हणणे आहे की, या कर्जांवर तो दुप्पट किंवा तिप्पट व्याज आकारत असे. एकदा शरद मैदकडून कोणी कर्ज घेतले की ते परत करायचे, पण कर्ज कधीच फेडले जात नव्हते, ज्यामुळे ते थकून जायचे.
