अकोला दिव्य न्यूज : ३० कोटीच्या कर्जापोटी तब्बल ६० कोटी रुपये देऊनही कर्जाच्या विळख्यात अडलेल्या एका होतकरू तरूणाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणा-या पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांच्या नियमबाह्य व बेकायदा कारभाराला रिझर्व्ह बँक आणि महाराष्ट्रातील सहकार विभागाचे पाठबळ असल्यानेच त्यांची गुंडगिरी वाढत चालली आहे. हे अकोला व शेगांव येथील कर्जदारांसोबत केलेल्या गैर कायदेशीर कारवाईने स्पष्ट झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कंत्राटदार नागपूर येथील वर्मा यांच्या आत्महत्येनंतर मैंद यांच्या बेकायदेशीर कार्य व कारवाईने अकोला व शेंगाव येथील अनेक कर्जदारांनचे जीवन उद्ध्वस्त झाल्याचे उघडकीस आले आहे.
अकोला येथील एका व्यावसायिकांने पुसद अर्बन बॅकेकडून घेतलेले कर्ज थकीत झाल्यानंतर ओटीएस अंतर्गत सरसकट पुर्ण रक्कम जमा केली असतानाही पुन्हा वसूली काढली आणि बॅकेला तारण दिली नसलेली अकोला शहरातील या कर्जदारांच्या मालमत्तेचे डीडीआरकडून लिलाव करून घेतला.सदर मालमत्ता ही बॅकेचा संचालकांच्या माध्यमातून मैंदनी बळकावून घेतली.

सदर व्यवसायींकाची अकोट रोडवरील शेतजमीनही मैंद यांनी स्वतः विकत घेतली. सहाय्यक निबंधकाला (टीडीआर) लिलावापुर्वी या सगळ्या गोष्टी लक्षात आणून देऊनही त्यांनी लिलाव केला. लिलावाची बोली मंजूर केली आणि मैंद यांनी पोलिस बळाचा वापर करून ताबा घेतला. सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे. न्यायालयीन निकाल कधी लागतो, हे कोणीही सांगू शकत नाही आणि त्यानंतरही अपील करण्याचा अधिकार असतो, तेव्हा मरेपर्यंत लढा आहेच.
अकोला येथील हे प्रकरण शुद्ध आर्थिक फसवणूकीचे असून पोलिस मात्र टरका मायशीनचा वापर करून मोकळे होतात. शेगांव येथील जवळपास ४ व्यावसायिकांची पुसद अर्बन बँकेने मोठ्या रकमेची आर्थिक फसवणूक केली असल्याचे आता उघडकीस आले. यापैकी एकाने न्यायालयात खटला दाखल केला असून, अद्याप निकाल लागला नाही. विशेष म्हणजे न्यायालयाचा आदेश असताना आणि याबाबत मैंद यांना माहिती असून देखील सदर व्यवसायींकाची शेतजमीन कर्ज प्रकरणात गहाण ठेवून कर्ज दिले. याबाबत सदर व्यवसायींकाने रिझर्व्ह बँकेकडे सर्व कागदपत्रे सादर करून, बेकायदेशीर शेतजमीन तारण घेतल्याची तक्रार केली. मात्र रिझर्व्ह बँकेने आजवर कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली नाही.
अकोला व बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वतः पुढाकार घेऊन फसवणूक झालेल्या लोकांची तक्रार दाखल करून, चौकशी केली तर बॅकेचे अध्यक्ष शरद मैंद यांच्या कोट्यावधी रुपयांचा अपहार समोर येऊन पिडीतांना न्याय मिळेल अन्यथा भविष्यात अजून दुर्दैवी घटना घडली तर जबाबदार कोण ?
