अकोला दिव्य न्यूज : विमा क्षेत्रात विशेषतः जनरल इन्शुरन्स क्षेत्रात गेल्या पन्नास वर्षांपासून सातत्याने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अकोला शहरातील कलंत्री परिवाराला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा सन्मान प्राप्त झाला आहे.भारतातील नामांकित एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीकडून रोशनी विशाल कलंत्री यांना त्यांच्या परिवारासह नुकत्याच अबू धाबी येथे झालेल्या सोहळ्यात सन्मानित करण्यात आले.

या पुरस्कार सोहळ्यात रोशनी कलंत्री यांच्या सोबत त्यांच्या सासू श्रीमती कांतादेवी गोपलदास कलंत्री, पती विशाल कलंत्री, मुलगा वीर व मुलगी दिविशा उपस्थित होते. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध लेखक लेफ्टनंट जनरल के.जे.एस. ढिल्लों उपस्थित होते. रोशनी कलंत्री यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार कंपनीचे संचालक पर्थनिल घोष यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
संपूर्ण भारतातील तब्बल १ लाख २५ हजार विमा सल्लागारांमधून आणि मुंबई वगळता आरोग्यविमा क्षेत्रात महाराष्ट्रातून राज्यामधून प्रथम क्रमांक पटकावण्याचा मान कलंत्री यांना मिळाला आहे. उत्कृष्ट व्यावसायिक कामगिरीची दखल घेऊनच हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर अनुज त्यागी, हेल्थ व्हर्टिकल हेड हितेश बिरानी व नॅशनल एजन्सी हेड सचिन सिंगल यांनी गौरवोद्गारांतून नमूद केले.

कलंत्री परिवाराला यापूर्वीही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. या नव्या यशामुळे अकोला शहरासह संपूर्ण विमा क्षेत्रात उत्साह निर्माण झाले असून या कामगिरीबद्दल बद्दल कलंत्री परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.
