Saturday, February 14, 2026
No menu items!
No menu items!
Homeवृक्षारोपण व संवर्धन !अकोला गार्डन क्लबची सभा संपन्न

वृक्षारोपण व संवर्धन !अकोला गार्डन क्लबची सभा संपन्न

अकोला दिव्य न्यूज : अकोला व नजिकच्या परिसरातील ओपन स्पेस मध्ये यंदाचा पावसाळ्यात वृक्षारोपण व संवर्धन या राष्ट्रीय कार्यक्रमाचे रितसर आयोजन करण्याचा निर्णय अकोला गार्डन क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या सभेत सर्वानुमते ठरविण्यात आले. अकोला गार्डन क्लब कडून मागिल 51 वर्षांपासून अकोला शहरात दरवर्षी “वार्षिक फ्लावर शो ” आयोजित करण्यात येत आहे. नागरिकांचा वाढता प्रचंड प्रतिसाद लक्षात घेता यावर्षी अकोला गार्डन क्लबकडून डिसेंबर मध्ये वार्षिक फ्लावर शोचे आयोजन करण्यावर चर्चा करण्यात आली.

अकोला गार्डन क्लब कडून अकोला शहर व जिल्हयात तज्ञांकडून जुलै ते आक्टोंबर महिन्यात परसबाग, टेरेस गार्डन तयार करणे, शेवंती व गुलाबांच्या झाडांची लागवड व त्यांची जोपासना, अडेनियम निर्मिती व त्यांची देखभाल, बोन्साय निर्मिती व त्यांची निगा, कँक्टस लागवड व जोपासना आणि जीवनावश्यक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची लागवड व त्यांची देखभाल या अत्यंत महत्वाच्या विषयांवर आवश्यक व योग्य स्वरूपाचे मार्गदर्शन वर्कशाँपच्या स्वरूपात अकोला शहरात करण्यात येणार आहे.


निसर्ग प्रेमी नागरिकांना योग्य मार्गदर्शन करणे व त्यांना यासाठी प्रेरित ,उद्युक्त करणे हा अकोला गार्डन क्लबचा प्रमुख उद्देश असून त्यांनी याचा अवश्य लाभ घ्यावाअसे आवाहन क्लबचे अध्यक्ष संजय शर्मा यांनी केले आहे. सभेत उपाध्यक्ष शरद कोकाटे, सचिव श्याम गोटफोडे, माजी अध्यक्ष जयप्रकाश पाटिल, अजय सेंगर, प्रफुल्ल लहाने, क्लबचे सहसचिव दिनेश पारेख, सहकोषाध्यक्ष सुनिल कविश्वर तसेच मुख्य कार्यकारिणी सदस्य संजय हेडा, संजय श्रावगी, निरज आंवडेकर, संदीप पाटील महल्ले, हरिश मालपाणी, निशिकांत बडगे, आलोक खंडेलवाल, भूषण ताजणे, विजय ढवळे, अनुराधा ढवळे, कोकिळा पाटिल,सुनिता संजय शर्मा, व प्रविण इंगळे उपस्थित होते.
सभेचे संचालन व आभार प्रदर्शन अकोला गार्डन क्लबचे सचिव श्याम गोटफोडे यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!