Saturday, February 14, 2026
No menu items!
No menu items!
Homeअकोल्यात खून ! रणपिसे नगरात संजय कौसल यांची हत्या

अकोल्यात खून ! रणपिसे नगरात संजय कौसल यांची हत्या

अकोला दिव्य न्यूज : अकोला शहरातील रणपिसे नगर परिसरात काल सोमवारी रात्री मुरलीधर टॉवर येथे राहणारे ६० वर्षीय सेवानिवृत्त अभियंता संजय कौसल यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. महेंद्र पवार या सराईत गुन्हेगाराने कौसल यांच्यावर धारदार लोखंडी टिकासने वार करत जागीच ठार केले. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेआठ वाजता घडली. संजय कौसल यांच्या छातीवर आणि डोक्यावर जबर वार करण्यात आले. या थरारक घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद
संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे. मारेकरी महेंद्र पवार याचा गुन्हेगारी इतिहास गंभीर आहे. यापूर्वीही त्याच्यावर प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. काही दिवसांपूर्वीच तो न्यायालयीन जामिनावर सुटला होता.

मृतक आणि आरोपी एकाच इमारतीचे रहिवासी
ही थरारक घटना मुरलीधर टॉवर, रणपिसे नगर येथे घडली. विशेष म्हणजे मृतक संजय कौसल आणि आरोपी महेंद्र पवार हे दोघेही एकाच इमारतीत राहतात. त्यामुळे या घटनेमुळे स्थानिकांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.

पोलिसांचा बंदोबस्त आणि तपासाला वेग
घटनास्थळी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आरोपीच्या शोधासाठी दोन विशेष पथके तात्काळ रवाना करण्यात आली आहेत. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक सतीश कुलकर्णी, सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्याचे ठाणेदार जयवंत सातव आणि इतर वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहेत.

आमदार रणधीर सावरकर यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. पोलिसांकडून संपूर्ण माहिती घेऊन, आरोपीला तातडीने अटक करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे ही घटना त्यांच्या निवासस्थानाच्या जवळच घडल्यामुळे त्यांनी त्वरित हस्तक्षेप केला.

शहरात भीतीचं वातावरण
थरारक घटनेमुळे अकोला शहरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. गुन्हेगार खुलेआम हिंसक कृत्य करत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस तपास सुरू आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!