Monday, April 28, 2025
HomeUncategorizedउद्या परशुराम जयंती ! जाणून घेऊया त्यांच्या ५ कथा आणि चिरंजीवाचे रहस्य

उद्या परशुराम जयंती ! जाणून घेऊया त्यांच्या ५ कथा आणि चिरंजीवाचे रहस्य

अकोला दिव्य न्यूज : Fact About Lord Parshuram: वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला भगवान विष्णूंनी भगवान परशुराम म्हणून सहावा अवतार घेतला. त्यामुळे अक्षय्य तृतीयेसोबतच परशुराम जयंतीही साजरी केली जाते. भगवान परशुराम हे ब्राह्मण होते पण त्यांच्यात क्षत्रियाचे गुण होते. त्यांचे नाव परशुराम कसे पडले? जाणून घेऊया त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही खास कथा आणि रहस्य….

भगवान विष्णूचा सहावा अवतार परशुराम यांची वैशाख महिन्यातील तृतीया तिथीला जयंती साजरी केली जाते. भगवान परशुराम यांना चिरंजीव मानले जाते. भगवान परशुरामांच्या अशा अनेक कथा पौराणिक कथांमध्ये वर्णन केल्या आहेत, ज्यावरून हे दिसून येते की परशुराम अत्यंत क्रोधित स्वभावाचे आहेत. यासोबतच परशुराम विश्वाच्या अंतापर्यंत पृथ्वीवर विराजमान राहणार असल्याचे अनेक कथांमधून कळते. परशुराम जयंतीनिमित्त भगवान परशुरामांच्या ५ कथा जाणून घेऊया.

भगवान परशुरामांचा क्रोधी स्वभाव का ? जमदग्नी ऋषीं आणि रेणुका यांच्या पाच मुलांपैकी परशुराम हे चौथे होते. विवाहानंतर सत्यवतीने महर्षी भृगु यांच्याकडून पुत्र प्राप्तीचे वरदान मागितले. तेव्हा महर्षी भृगु यांनी तिला २ फळे दिली आणि सांगितले की ऋतू स्नानानंतर तू उंबराच्या झाडाला आणि तुझ्या आईला पिंपळाच्या झाडाला आलिंगन द्यायला सांग आणि मग हे फळ खा. परंतु सत्यवती आणि तिच्या आईने या कामात चूक केली आणि चुकीच्या झाडांना आलिंगन देऊन फळ खाल्ले. जेव्हा ही गोष्ट महर्षी भृगुना समजली तेव्हा त्यांनी सत्यवतीला सांगितले की तुम्ही चुकीच्या झाडाला आलिंगन दिले आहे. म्हणूनच तुझा पुत्र ब्राम्हण असूनही क्षत्रिय गुणांचा होईल आणि तुझ्या मातेचा पुत्र क्षत्रिय असून देखील ब्राम्हणासारखे वर्तन करेल. हेच कारण होते की परशुराम ब्राम्हण असून देखील क्षत्रिय गुणांचे होते आणि विश्वामित्र क्षत्रिय असून देखील त्यांनी ब्रम्हर्षी पद प्राप्त केले. त्यामुळे परशुराम हे जमदग्नी ऋषींचे पाचवे अपत्य झाले, जे बालपणापासूनच क्रोधी स्वभावाचे होते.

भगवान परशुरामांना हा परशु भगवान शिवाकडून मिळाला : भगवान परशुरामाचे मूळ नाव राम आहे. ते जमदग्नी ऋषींचे पुत्र असल्यामुळे त्यांना जमदज्ञ असेही म्हणतात. पण ते परशुरामाच्या नावाने जास्त प्रसिद्ध आहे. परशुराम हे देखील भगवान शिवाचे भक्त आणि शिष्य होत. त्यांची भक्ती आणि क्षमता पाहून भगवान शिवाने त्यांना विद्युभि नावाचा परशु दिला होता. नेहमी परशु धारण केल्यामुळे ते परशुराम या नावाने जगात प्रसिद्ध आहे.

परशुरामाने बनवले गणेशाला एकदंत : गणेश पुराणानुसार, महादेवाचे निस्सीम भक्त असलेले परशुराम कैलास पर्वतावर शिवनाथांचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. मात्र, प्रथमेश गणपतीने त्यांना प्रवेशद्वारावरच अडवले. शिवशंकरांचे दर्शन घेण्यासाठी गणपती अडवत असल्याचे परशुरामांना खटकले. विनंती करूनही गणेश भगवंतांचे दर्शन घेण्यापासून रोखत आहेत म्हटल्यावर परशुरामांनी गणाधीशाला युद्धाचे आव्हान दिले. दोघांमध्ये मोठे युद्ध झाले. त्यात परशुरामांनी परशूने गणरायावर जोरदार प्रहार केला. त्यातच लंबोदराचा एक दात निखळला. तेव्हापासून पार्वतीनंदन एकदंत नावाने ओळखले जाऊ लागले.

परशुरामने भगवान रामाला युद्ध करण्याचे आव्हान दिले : सीता स्वयंवराच्या वेळी जेव्हा रामाने भगवान शिवाचे धनुष्य तोडले तेव्हा पृथ्वी हादरली, अशी आख्यायिका आहे. सीतास्वयंवरावेळी शिवशंकरांचे शिवधनुष्य भंग केल्यावर मिथिलेत परशुराम प्रकट झाले. यावेळी ते महेंद्र पर्वतावर ध्यानस्त बसले होते. सुरुवातीला विष्णूस्वरूप श्रीरामांना परशुराम ओळखू शकले नाही. ते महाराज जनकाच्या दरबारात पोहोचले आणि भगवान रामाला युद्धासाठी आव्हान देऊ लागले. त्यावेळी भगवान रामाने परशुरामाला आपण भगवान विष्णूचा अवतार असल्याची जाणीव करून दिली. भगवान रामाचे रहस्य कळल्यावर परशुराम यांचा राग शांत झाला.

परशुराम श्रीकृष्णाला भेटले : द्वापरमध्ये भगवान विष्णू श्रीकृष्णाच्या रुपात अवतरले तेव्हा परशुराम आणि भगवान श्रीकृष्ण यांची भेट झाली. जेव्हा भगवान श्रीकृष्ण गुरु सांदीपनीच्या आश्रमात शिक्षण घेऊन घरी परतण्याच्या तयारीत होते. त्यावेळी परशुराम ऋषी सांदीपनी यांच्या आश्रमात आले आणि त्यांनी त्यांचे सुदर्शन चक्र भगवान श्रीकृष्णाला परत केले आणि सांगितले की आता हे युग तुमचे आहे. तुम्ही तुमच्या या सुदर्शन चक्राची काळजी घ्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!