अकोला दिव्य न्यूज : Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवार दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवाद्यांनी भारताला कधीही भरुन न निघणारी जखम दिली. पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी विविध राज्यातून काश्मीर पाहायला आलेल्या पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत 26 पर्यटकांचा मृत्यू झाला, तर अनेकजण रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत.

विशेष म्हणजे, या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार करण्यापूर्वी त्यांना नाव आणि त्यांचा धर्म विचारला. एवढ्यावरही मन न भरल्यामुळे काही पर्यटकांच्या पँट काढून तपासल्या, तर काहींना कलमा पढायला लावला. अशारितीने 26 पर्यटकांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.

आता या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या मृत पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातील हेमंत सतीश जोशी ठाणे, अतुल श्रीकांत मोनी मुंबई, संजय लक्ष्मण लाली ठाणे, दिलीप दासील पनवेल, संतोष जगधा पुणे आणि कस्तुभ गावनोटय पुणे या 6 पर्यटकांचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. याशिवाय, तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात, युएई, नेपाळ आणि उत्तर प्रदेश-हरियाणा येथील पर्यटकांनाही आपला जीव गमवावा लागला.

पाहा संपूर्ण यादी
गुजरात
सुमित परमार – भावनगर(गुजरात)
यतेश परमार – भावनगर(गुजरात)
शैलेशभाई एच. हिमतभाई कलाथिया – सुरत( गुजरात)
कर्नाटक
मधुसूदन सोमिसेट्टी – बंगलोर (कर्नाटक)
मंजू नाथ राव – (कर्नाटक)
भारत भूषण – सुंदर नगर, बंगळुरू (कर्नाटक)
पश्चिम बंगाल
बिटन अधिकारी – विष्णू, कोलकाता (पश्चिम बंगाल)
समीर गुहर – कोलकाता (पश्चिम बंगाल)

सुशील नाथयाल – इंदूर (मध्य प्रदेश)
सय्यद आदिल हुसेन शाह – हापतरंडी, पहलगाम (जम्मू–काश्मीर)
विनय नरवाल – कर्नाल (हरियाणा)
नीरज उडवानी – उत्तराखंड
सुदीप न्युपाने – बटवाल, रुपंदेही (नेपाळ)
शुभम द्विवेदी – शाम नगर, कानपूर शहर, उत्तर प्रदेश
प्रशांत कुमार सत्पथी – मालस्वार, ओडिशा
मनीष रंजन (आबकारी निरीक्षक) – बिहार
एन. रामचंद्र – कोची, केरळ
दिनेश अग्रवाल – चंदीगड
जे. सचिंद्र मोली – पांडोरंगापुरम, बालासोर (ओडिशा)
तेगेलेलिंग (वायुसेना कर्मचारी) – झिरो, अरुणाचल प्रदेश