Wednesday, April 16, 2025
HomeUncategorizedभाजप पदाधिकाऱ्याची हत्या ! बीड जिल्हा पुन्हा हादरला

भाजप पदाधिकाऱ्याची हत्या ! बीड जिल्हा पुन्हा हादरला

अकोला दिव्य न्यूज : माजलगाव शहरातील भाजप कार्यालयातून बाहेर निघालेल्या तालुका सरचिटणीसवर वार करत असताना ते तेथून पळाले. वाचवा म्हणत ओट्यावर बसलेल्या लोकांकडे पळाले असता त्यांच्यावर पाठीमागून आलेल्या आरोपीने शरीराच्या एका बाजूस कोयत्याने वार केला. ‘बलात्कार करतो का’ असे म्हणत त्याच्या शरीरावर सपासप वार केले. यात पदाधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या थरारक घटनेमुळे माजलगाव व बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. हत्येनंतर आरोपी पोलिसांना शरण आला.    

मयताचे नाव बाबासाहेब प्रभाकर आगे (३४)आहे, तर नारायण शंकर फपाळ (३८) असे आरोपीचे नाव आहे.बीड जिल्ह्यातील माजलगाव बसस्थानकापासून जवळच असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात भाजपचे तालुका सरचिटणीस व बीड जिल्हा लोकसभेचे विस्तारक असलेले बाबासाहेब आगे आपल्या साथीदारांसह बसले होते.  दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ते कार्यालयातून बाहेर पडत असताना हातात कोयता घेऊन आलेल्या नारायण फपाळ याने अचानक येऊन बाबासाहेब आगेंवर वार करण्याचा प्रयत्न केला. 

सकाळपासूनच करत होता पाठलाग : सकाळपासून नारायण हा बाबासाहेब आगे यांचा पाठलाग करत होता. तो भाजप कार्यालयात बसलेला असताना नारायण हा बाजूलाच असलेल्या एका दुकानासमोर दबा धरून बसला होता. जसा तो बाहेर आला, तसा याने वार केला; परंतु तो चुकवला आणि पुढे जाऊन पुन्हा पकडून वार केले.

हत्या केल्यानंतर आरोपी नारायण हा स्वत:हून माजलगाव शहर पोलिस ठाण्यात गेला. तेथे हजर अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्याने आपण खून केल्याची कबुली दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!