अकोला दिव्य न्यूज : अकोला जिल्ह्यातील धार्मिक व सामाजिक क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे समाजसेवक बाळू ढोले पाटील यांची हनुमान सेनेच्या अकोला जिल्हाध्यक्षपदी नुकतीच एकमताने निवड करण्यात आली. हनुमान जयंतीनिमित्त हनुमान सेनेच्या बॅनरचे प्रकाशन माजी महापौर व हनुमान भक्त मदन भरगड यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी हनुमान सेनेचे संस्थापक व अध्यक्ष बाळू ढोले पाटील, अकोला महानगरपालिकेचे माजी नगरसेवक दीप मनवाणी, युवा नेते अभिषेक भरगड, सामाजिक कार्यकर्ते गजानन हरणे उपस्थित होते.

नवनियुक्त जिल्हाध्यक्ष बाळू ढोले पाटील म्हणाले की, हनुमान सेना धार्मिक कार्य आणि धर्मरक्षणासाठी कार्यरत राहणार आहे. तरुणांना सामावून घेऊन धार्मिक व सामाजिक कार्यात अधिक भरीव योगदान देण्याची इच्छा असून समाजातील सर्व लोकांना एकत्र आणून हिंदू धर्माच्या मूल्यांचा प्रचार व प्रसार करण्यात येईल, असे ते म्हणाले.
या निवडीमुळे जिल्ह्यातील हनुमान सेनेच्या कार्याला नवी दिशा मिळणार आहे. बाळू ढोले पाटील यांचा कार्यानुभव आणि त्यांची जनमानसात असलेली लोकप्रियता संस्थेच्या विस्तारासाठी निश्चितच उपयोगी पडेल. अकोला जिल्हा हनुमान सेनेच्या वतीने लवकरच सर्व तहसील, शहर व अकोला महानगरांमध्ये कार्यकारिणीची स्थापना करण्यात येणार आहे. त्यांच्या या निवडीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.