अकोला दिव्य न्यूज : शहरात सामाजिक सेवा आणि कल्याणकारी योजना संचालित करण्यात अग्रेसर मारवाडी युवा मंचच्या अकोला शाखेची वर्ष २०२५-२६ नवीन कार्यकारिणीची घोषणा माजी राष्ट्रीय निकेश गुप्ता, प्रांतीय उपाध्यक्ष रोहित रुंगटा, निवर्तमान प्रांतीय महामंत्री मनोज अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित अध्यक्ष भूषण सतीशचंद्र अग्रवाल यांनी केली.

जाहीर केलेल्या कार्यकारिणीत अध्यक्षपदी भुषण अग्रवाल तसेच उपाध्यक्षपदी रितेश चौधरी, आशुतोष वर्मा आणि पीयूष खंडेलवाल तर सचिव म्हणून निर्मल जैन तर सहमंत्रीपदी सर्वेश सोनालावाला व श्रीकांत बंग आणि कोषाध्यक्षपदी केतन गुप्ता, अंकेक्षकपदी ऋषि अग्रवाल तसेच प्रचार मंत्री म्हणून अभिजित गोयनका व जनसंपर्क अधिकारी अभिषेक अग्रवाल व ओम अग्रवाल यांची निवड करण्यात आली.
यासोबतच कार्यकारिणी सदस्य म्हणून संजय अग्रवाल, कुंजीलाल सुनारीवाल, निलेश बोर्डीवाला, संतोष छाजेड, हरीश खंडेलवाल, प्रदीप रांदड, रोहित गुप्ता, अभिषेक सोनालावाला, स्वप्निल जैन, मनोज अग्रवाल, जितेंद्र बोरा, प्रतुल भारुका, नमन खंडेलवाल, सुनील शर्मा, सूरज काबरा, योगेश गोयल, लवेश कागलीवाल, यश अग्रवाल, रितिक अग्रवाल, सुमित वर्मा, सुमित खंडेलवाल, राहुल चौधरी, प्रतीक मित्तल, रितेश गोयल, अंकुश सावना, नेमीचंद अग्रवाल स्नेह छवछरीया यांचा समावेश आहे.

नवनिर्वाचित कार्यकारिणीने मंचाचे उद्दिष्ट साकार करण्यासोबतच समाज सेवा क्षेत्रामध्ये नवीन उच्चांक प्रस्थापित करण्याचा संकल्प केला. नूतन अध्यक्ष भूषण अग्रवाल यांनी सामाजिक व सांस्कृतिक संवर्धन आणि सामाजिक विकासाला प्राधान्य देण्यासाठी लोककल्याणकारी कार्यांना गतिमान प्रदान करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी माजी राष्ट्रीय अध्यक्ष गुप्ता नवनिर्वाचित कार्यकारिणीला शुभेच्छा देत, मंचाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी त्यांच्या योगदानाची प्रशंसा केली. तसेच मारवाडी युवा मंचाची अकोला शाखा समाजात सकारात्मक बदल घडवून आणेल आणि युवकांना समाज सेवेत जोडून नवीन उदाहरण कायम करेल.असा विश्वास व्यक्त केला.