अकोला दिव्य न्यूज : पातूर-मलकापूर (ग्रामीण) रस्त्याजवळील गावठाण परिसरात एका ६० वर्षीय वृद्धाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली होती.पातूर पोलिसांनी संशयित म्हणून इजरार खान मुकद्दर खान याला ताब्यात घेत कसून चौकशी केली असता, खानने हत्येची कबुली दिली. सध्या आरोपी इज्जार खान मुकद्दर खान पोलिस कोठडीत असून, पादण रस्त्याच्या वादातून खून झाल्याचे उघडकीस आले.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास काही स्थानिक नागरिक गावठाण संकुलातून जात असताना, रस्त्याच्या कडेला एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली. जवळ जाऊन पाहिले तर तो रक्ताने माखलेला आढळला. त्याच्या पोटावर धारदार शस्त्राने खोलवर वार करण्यात आले होते. मृताचे नाव सय्यद झाकीर सय्यद मोहिउद्दीन (६० वर्षे, रा. मुजावरपुरा, पातूर) असे आहे. घटनेची माहिती मिळताच पातूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळाची स्थिती आणि मृताच्या शरीरावर आढळलेल्या जखमा पाहता, पोलिसांनी असा अंदाज लावला होता की ही हत्या नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणात, तक्रारदार आणि मृताचा मुलगा सय्यद शाकीर सय्यद झाकीर यांनी पातूर पोलिस ठाण्यात या हत्येची तक्रार दाखल केली.

ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून इजरार खान मुकद्दर खान, वय ३५ वर्षे (रा. मुजावरपुरा) यांचे शेत आणि त्यांचे शेत एकाच परिसरात आहे. शेताच्या पादण (कच्चा रस्ता) रस्त्यावर जाण्यावरून सय्यद झाकीर व इजरार खान मुकद्दर खान यांच्यात यापूर्वीही अनेक भांडणे झाली आहेत. इजरार खान मुकद्दर खान नेहमीच त्यांना त्यांच्या शेतात जाण्यापासून अडकवत असे.

या भांडणाबाबत २७ एप्रिल रोजी पातूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. १२ एप्रिल रोजी सायंकाळी सैय्यद जाकीर आपल्या शेतातील जनावरांना चारा घालण्यासाठी गेले.पण रात्री उशिरापर्यंत तो परतला नाही. तेव्हा कुटुंबीय त्याचा शोध घेण्यासाठी शेतात गेले. तिथे त्यांना पातूर-मलकापूर (ग्रामीण) रस्त्यावर सय्यद झाकीरचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला.

मृताच्या मुलाने पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या शत्रुत्वामुळे इजहार खान मुकद्दर खानने परिस्थितीचा फायदा घेत सय्यद झाकीरची हत्या केली. त्याआधारे पातूर पोलिसांनी इजरार खान मुकद्दर खान याला ताब्यात घेतले व इजरार खान मुकद्दर यांच्याकडे चौकशी केली.

पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच खानने हत्येची कबुली दिली. सध्या या प्रकरणातील आरोपी इज्जार खान मुकद्दर खान पोलिस कोठडीत आहे. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १०३ (१), २३८ (३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकारी आणि पातूर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
