Friday, April 18, 2025
HomeUncategorizedहनुमान जन्मोत्सव उद्या!जाणून घ्या पूजा विधि आणि शुभ मुहूर्त

हनुमान जन्मोत्सव उद्या!जाणून घ्या पूजा विधि आणि शुभ मुहूर्त

अकोला दिव्य न्यूज : hanuman janmotyaw puja vidhi: दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला बजरंग बली हनुमान जन्मोत्सव साजरा केला जाते. असे मानले जाते की या दिवशी भगवान राम आणि हनुमानजींची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटांपासून मुक्तता मिळते. याबद्दल आणखी काही गोष्टी जाणून घेऊयात.

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण अगदी उत्साहात साजरा केले जातात. प्रत्येक सणाला विशेष महत्त्व दिले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, हनुमानाची पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. अनेकवेळा तुम्ही भरपूर मेहनत करता परंतु तुमची प्रगती होत नाही. तुमच्या सोबत देखील असचं होत असेल तर तुम्ही हनुमानाची पूजा करणे फायदेशीर ठरेल.

देशभरात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी बजरंगबली हनुमानाची पूजा केल्याने व्यक्तीचे सर्व त्रास दूर होतात. तसेच, व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. याशिवाय या दिवशी विविध ठिकाणी भव्य भंडारा/महाप्रसाद वा मेजवानी देखील आयोजित केल्या जातात.

धार्मिक श्रद्धेनुसार, हनुमानजींचा जन्म चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी आई अंजनी आणि राजा केसरी यांच्या पोटी झाला होता. हिंदू कॅलेंडरनुसार, हनुमान जयंती म्हणजेच चैत्र महिन्यातील पौर्णिमा तारीख 12 एप्रिल रोजी पहाटे 3:21 वाजता सुरू होईल. तसेच, तारीख दुसऱ्या दिवशी 13 एप्रिल रोजी सकाळी 5:51 वाजता संपेल. उदय तिथीनुसार, 12 एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाईल.

हनुमान जयंती पूजा विधी – हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी हनुमानजींसोबत भगवान राम आणि माता सीतेची पूजा केली जाते. या दिवशी सकाळी उठून आंघोळ करा आणि लाल कपडे घाला. त्यानंतर, हनुमानजींना प्रसाद म्हणून सिंदूर, लाल फुले, तुळशीची पाने, चोळा आणि बुंदीचे लाडू अर्पण करा. त्यानंतर मंत्राचा जप करा. त्यानंतर हनुमान चालीसा आणि सुंदरकांड पठण करा. शेवटी आरती करा आणि सर्वांना प्रसाद वाटा.

हनुमान जयंतीचे महत्त्व : हिंदू धर्मात हनुमंताला ७ चिरंजिवींपैकी एक मानले जाते. हनुमान अजूनही पृथ्वीवर आहे असे म्हटले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार, हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी योग्य विधींनी पूजा केल्याने व्यक्तीला हनुमानजींचा आशीर्वाद मिळतो, ज्यामुळे त्याच्या जीवनातील सर्व दुःख आणि संकटे दूर होतात. या दिवशी, पूजेदरम्यान त्यांना फुले, हार, सिंदूर, बुंदी किंवा बेसनाचे लाडू, तुळशीची पाने अर्पण करून ते प्रसन्न होतात.

हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी व्रत केल्यामुळे तुम्हाला हनुमानजींची कृपा प्राप्त होते आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख, शांति आणि समृद्धी नांदते. संतान प्राप्तीसाठी हनुमान जन्मोत्सवाचा व्रत करणे फायदेशीर ठरते. तुमच्या आयुष्यातील संकट दूर करण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान चालिसाचे पठण करा.

मंगळवारच्या दिवशी हनुमानाची पूजा आणि त्यांना सिंदूर अर्पण केल्यामुळे तुमच्या कुंडलीतील मंगल दोष कमी होतो. हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी धार्मिक उपाय केल्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!