Friday, April 18, 2025
HomeUncategorizedरुग्ण सेवेचा बट्डेंट्याबोळ ! डेंग्यूने आजारी मुलीच्या उपचाराचे बिल तब्बल 6 लाख...

रुग्ण सेवेचा बट्डेंट्याबोळ ! डेंग्यूने आजारी मुलीच्या उपचाराचे बिल तब्बल 6 लाख रुपये

अकोला दिव्य न्यूज : पुन्हा एकदा राज्यभरात रुग्णांचे खाजगी रुग्णालयांतील आर्थिक शोषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गरोदर महिलेचा मृत्यू नंतर कारभाराची चौकशी सुरू असताना आणि मुंबई येथील पंडित मदनमोहन मालवीय रुग्णालयात डॉक्टर हजर नसल्याने रुग्णांच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच संभाजी नगर येथे ही तिसरी घटना घडल्याने आरोग्यव्यवस्थेतील पारदर्शकतेवर आणि नियमांवर प्रश्न उपस्थित करते.

डेंग्यूने त्रस्त एका अल्पवयीन मुलीच्या 10 दिवसांच्या उपचारासाठी तब्बल सहा लाख रुपयांचे बिल एका खाजगी धर्मादाय रुग्णालयाने दिले. आधीच मोठा खर्च झाल्याने रुग्णाचे नातेवाईक नवीन बिलाने हतबल झाले. या प्रकाराची माहिती मिळताच शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी तातडीने हस्तक्षेप करून शहरातील खाजगी रुग्णालयातील डॉक्टरला चांगलेच सुनावले. गरिबांची आर्थिक पिळवणूक थांबवण्याचे आवाहन करत रुग्णालयाने उर्वरित बिल माफ करण्याची मागणी आमदार बांगर यांनी केली आहे. या संपूर्ण प्रकरणात आमदार बांगर आणि डॉक्टर यांच्यातील संवाद व्हायरल झाला आहे .सामान्य माणसासाठी खाजगी रुग्णालयात उपचार घेणे अवघड होत चालले आहे. या प्रकारांवर शासनाने तातडीने लक्ष घालून कठोर नियंत्रण आणण्याची गरज निर्माण झाल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील आदिती माणिकराव सरकटे या मुलीला डेंग्यू झाला होता. तिच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेता, तिला छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारासाठी रुग्णालय प्रशासनाने तब्बल तीन लाख रुपयांचे औषधं मागवली. प्रकृती सुधारल्यानंतर रुग्णालयाने आणखी २ लाख ८५ हजार रुपयांचे बिल दिले. त्यातील १ लाख ८० हजार रुपये आधीच भरले गेले होते. मात्र त्यानंतर पुन्हा ८५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली, जी रुग्णाच्या कुटुंबीयांसाठी कठीण होती. त्यामुळे शेवटी रुग्णाच्या कुटुंबीयांनी आमदार संतोष बांगर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी लगेच रुग्णालयातील डॉक्टरांशी फोनवर संवाद साधत परिस्थितीची चौकशी केली.  या घटनेनंतर सामान्य जनतेत तीव्र संताप निर्माण झाला आहे.

तुम्ही काय अमृत पाजलं रुग्णाला?
यावेळी आमदार बांगर यांनी “दहा दिवसांत सहा लाख रुपयांचं बिल कसं काय? तुम्ही काय अमृत पाजलं रुग्णाला?” अशा शब्दात फटकारले. डॉक्टरांनी रुग्ण गंभीर होता आणि व्हेंटिलेटरवर होता असं सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, आमदार बांगर यांनी थेट सांगितलं की, “रुग्ण चांगला झाला हे स्वागतार्ह आहे, पण याचा अर्थ गरिबांना लुटायचा नव्हे. आम्ही पदरमोड करून रुग्ण वाचवतो, तेव्हा अशी बिले अन्यायकारक आहेत. गरिबांची पिळवणूक थांबवा. त्यांनी स्पष्ट शब्दांत रुग्णालयाला चेतावणी दिली की, गरज पडल्यास कारवाई केली जाईल.

उर्वरित बिल माफ करण्याची मागणी
दरम्यान, संतोष बांगर यांच्या स्पष्ट आणि ठाम भूमिकेमुळे अखेर रुग्णालय प्रशासनाने उर्वरित रक्कम माफ करण्याचे आश्वासन दिले. मात्र, या प्रकरणाने राज्यभरात पुन्हा एकदा खाजगी रुग्णालयांतील आर्थिक शोषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!