Friday, April 18, 2025
HomeUncategorizedपोलिसाची गुंडगिरी ! तुम्ही हेल्मेट का घातलं नाही ? असं विचारल्यावर...

पोलिसाची गुंडगिरी ! तुम्ही हेल्मेट का घातलं नाही ? असं विचारल्यावर तरुणांच्या कानशिलात भडकावली

अकोला दिव्य न्यूज : एका तरुणाने वाहतूक पोलिसाला “हेल्मेट का घातलं नाही?” असा प्रश्न विचारल्यानंतर पोलीस अधिकारी संतापला आणि त्याने थेट तरुणाच्या कानशिलात लगावली. यासोबतच पोलिसाने तरुणाला शिवीगाळही केला. संबंधित पोलिसाचे म्हणणे आहे की, दात दुखत असल्याने त्यांनी हेल्मेट घातले केले नव्हते. या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण बघायला मिळतंय.

संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल : संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. पोलिस अधिकाऱ्याच्या या वागणुकीवर कारवाईची मागणीही होत आहे. संबंधित पोलिसावर कारवाई करण्यात यावी, अशा मागणी जोर धरू लागली आहे. नागपूर पोलिस विभागाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती देखील मिळतंय.

संबंधित तरुण आपल्या दुचाकीवरून जात असताना त्याने समोरून येणाऱ्या एका पोलिस कर्मचाऱ्याला हेल्मेट न घातल्याबद्दल विचारणा केली.तुम्हीच जर नियम तोडणार असाल, तर सामान्य नागरिक काय शिकणार?” असा प्रश्न तरुणाने विचारला. यावर  पोलिस कर्मचाऱ्याने संतप्त प्रतिक्रिया देत तरुणावर आरोप केला की, त्याने अपशब्द वापरले. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. काही क्षणांतच पोलिस कर्मचाऱ्याने युवकावर अपशब्द वापरल्याचा आरोप करत, त्याला दोन वेळा कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

संबंधित पोलिसावर कारवाई करण्याची मागणी : अनेकजण या प्रकारावर टीका करत आहेत आणि कायद्याचे रक्षण करणाऱ्यानेच कायद्याचा भंग केल्याने नाराजी व्यक्त करत आहेत. काहींनी पोलिस कर्मचाऱ्याच्या वर्तनावर प्रश्न उपस्थित केले असून काहींनी युवकाच्या धाडसाचं कौतुक केलं. पोलीस विभागाकडून याप्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, सोशल मीडियावर वाढती चर्चा पाहता, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लवकरच चौकशीचं आश्वासन दिलं जाऊ शकतं. ही घटना नागरिक आणि पोलिसांमधील विश्वासाच्या नात्याला धक्का देणारी आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!