अकोला दिव्य न्यूज : न्यू इंग्लिश हायस्कूल सॅलरी अर्नर्स को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी,अकोलाची वर्ष 2025-2030 साठी कार्यकारणीची निवड अविरोध होऊन सोसायटीचे अध्यक्ष म्हणून श्रीकांत हेमंत रत्नपारखी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून कुशल सुरेश भिडे, सचिव म्हणून श्रीकांत बाबुराव खंडारे, खजिनदार म्हणून तुषार नरहरीपंत उज्जनकर यांची निवड करण्यात आली.

नवीन संचालक मंडळात सदस्य म्हणून उदय कोल्हेकर, मिलिंद घोगले, गोपाल सांगूनवेढे, राहुल महाजन, प्रशांत हळवे, चंद्रकांत राठोड, मंगेश शिवणकर, अलका मुंढे, अर्चना रंजनकर, रसिका मोहरीर, सोनिया रोजतकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. प्राचार्य माधव मुनशी, अनिल देविकर, श्रीमती मेधा देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन संचालक मंडळाचे अभिनंदन करण्यात आले.

संस्थेच्या स्थापनेपासून संचालक मंडळ बिनविरोध निवडून देण्याची परंपरा यावेळीही कायम राहून एकमताने संचालकांना निवडून दिले. निवनियुक्त संचालक मंडळाचे पदाधिकारी व सदस्यांचे अकोला एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव प्रा.श्रीकृष्ण अमरावतीकर व न्यू इंग्लिश हायस्कूल व क.म.वि.चे प्राचार्य माधव मुनशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

निवडणूक निर्णय अधिकारी अनिता भाकरे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक बिनविरोध होऊन संस्थेची परंपरा कायम राखल्याबद्दल नवनियुक्त अध्यक्ष श्रीकांत रत्नपारखी यांनी संचालक मंडळाचे आभार मानले. सर्व सभासदांचे हित साधण्यासाठी सर्व संचालक मंडळ सदैव कार्यरत राहील अशी ग्वाही दिली. माजी अध्यक्ष नंदकिशोर थुटे, माजी सचिव योगेश बपोरीकर, उपमुख्याध्यापक उदय हातवळणे, पर्यवेक्षक हेमंत ओझरकर यांनी नवीन संचालक मंडळाला शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
