अकोला दिव्य न्यूज : महाराष्ट्र शासनाच्या राजस्व खात्यातील भुमि अभिलेख कार्यालयाची कर्तव्य आणि जबाबदारी व कार्यपद्धतीचा सर्वसामान्य माणसाला जुजबी माहिती व्हावी यासाठी दरवर्षी 10 एप्रिल हा दिवस भू मापन दिन म्हणून साजरा केल्या जातो.दरवर्षी प्रमाणे यंदाही 10 एप्रिल रोजी हा दिवस साजरा करण्यात येणार होता. परंतु यंदा 10 एप्रिलला भगवान महावीर जयंती असून या दिवशी शासकीय सुट्टी असल्याने यंदा अकोला भूमिअभिलेख विभागातील भू मापन दिन उद्या बुधवार 9 एप्रिलला साजरा करण्यात येत आहे.

अकोला जिल्हा भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक भारती खंडेलवाल अकोला यांच्या अध्यक्षतेखाली भू मापन दिवस साजरा होणार आहे. या कार्यक्रमात भूमिअभिलेख विभागाकडून करण्यात येणारे कार्य, नवीन योजना, भूमिअभिलेख विभागाच्या सर्व ऑनलाईन सेवा व त्यांचा उपयोग आणि वापर कसा करायचा व या विभागाचे सर्व जुने अभिलेख व त्यांचे महत्त्व, ऑनलाईन असलेले रेकॉर्ड कसे करावे, वारसाचे अर्ज, मोजणी अर्ज, ऑनलाईन फेरफार अर्ज कसा करावा इत्यादी माहिती प्रत्याक्षिकांसह देण्यात येणार आहे.

जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना कार्यालयीन कामाची जुजबी माहिती आणि भूमिअभिलेख विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती व प्रसिद्धी होण्याकरिता नागरिकांनी उद्या 9 एप्रिलरोजी सकाळी 11 ते 2.30 वाजे पर्यंत उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयात हजर राहून भुमापन दिनाचा लाभ घ्यावा.असे आयोजकांनी केले आहे.