अकोला दिव्य न्यूज : Maharashtra Board 10th Results 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारी व मार्च महिन्यात पार पडल्या. आता दहावी बारावीचा निकाल (SSC Result 2025) कधी जाहीर होणार याची उत्सुकता सर्वांना आहे. मार्च महिन्यात परीक्षा संपल्यानंतर आता सर्व विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा लागली आहे. आता याबाबत मोठी अपडेट समोर आली.

मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच महाराष्ट्र राज्य परीक्षा बोर्ड दहावी व बारावी परीक्षांचे निकाल जाहीर करू शकते, अशी माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात दहावी (एसएससी परीक्षा २०२५) आणि बारावी (एचएससी परीक्षा २०२५) बोर्ड परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. वृत्तानुसार, यावर्षी दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे निकाल (HSC SSC Result 2025) वेळेपूर्वी जाहीर केले जाणार असल्याची माहिती आहे.

दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा संपल्यानंतर आता विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे डोळे निकालाच्या तारखेवर लागले आहेत. दरम्यान, परीक्षेच्या निकालांबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. यावर्षी दहावीचा निकाल १५ मे पूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे. यंदा लवकर निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दहावीच्या परीक्षेचा यंदाचा निकाल हा राज्य मंडळाच्या इतिहासात सर्वात जलद निकाल असेल असं म्हटलं जातंय. या वर्षी, महाराष्ट्रात दहावीची बोर्ड परीक्षा २१ फेब्रुवारी रोजी सुरू झाली आणि १७ मार्च रोजी संपली. परीक्षेनंतर लगेचच निकाल तयार करण्याचे काम वेळेवर पूर्ण व्हावे म्हणून उत्तरपत्रिका तपासण्याची प्रक्रियादेखील जलद गतीने सुरू करण्यात आली.

दहावीचा निकाल कधी जाहीर होणार या संदर्भात सोशल मीडियात अनेक मेसेजेस व्हायरल होत आहेत. मात्र, राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अद्याप दहावी बोर्डाच्या परीक्षेच्या अधिकृत निकालाची तारीख (SSC Result 2025 Date) जाहीर करण्यात आलेली नाही.
१० वीचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच : विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी वेळेवर संधी मिळावी म्हणून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) यावेळी बोर्ड परीक्षा लवकर घेतल्या होत्या, म्हणूनच आता निकाल लवकर जाहीर करण्याची योजना आहे. एवढेच नाही तर जुलैच्या पहिल्या आठवड्यात पुरवणी परीक्षा घेण्याचीही शक्यता आहे. गेल्या काही वर्षांत दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल मे महिन्याच्या अखेरीस जाहीर केले जात होते. जरी राज्य मंडळाने अद्याप एसएसएस निकाल २०२५ ची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही, परंतु असे म्हटले जात आहे की, निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच जाहीर केला जाईल, म्हणून विद्यार्थी आणि पालकांना महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे.