अकोला दिव्य न्यूज : देशातील चालुक्य राष्ट्रकूट सत्ता काळापासून अकोला गावात अस्तित्वात असलेले ग्रामदैवत व अकोलेकरांचे आराध्य दैवत राजेश्वर यांच्या पावन नगरीत, राम जन्मला ग सखे…चा निनाद दुमदुमून गर्दीचे विक्रम प्रस्थापित करणारा मध्य भारतातील लोकोत्सव यंदाही आज रविवार ६ एप्रिलला नवीन ऊर्जेने अकोला शहरात साजरा करण्यात येतो आहे.

प्रभू श्रीराम यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त राजेश्वर मंदिर व परिसर सुशोभित करण्यात आले आहे. राज राजेश्वर मंदिरातून दुपारी ४ वाजता निघणाऱ्या श्रीरामनवमी शोभायात्रेत लाखोंच्या संख्येने सहभागी होण्यासाठी, ‘चलो राजेश्वर मंदिर’ चा निरोप घरोघरी पोहचवण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. तर तमाम भाविक भक्त भव्य दिव्य शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी सुसज्ज झाल्याने यंदा गर्दीचा नवा उच्चांक प्रस्थापित होईल.

श्रीरामनवमी शोभायात्रा समितीचे सर्वसेवाधिकारी दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा प्रणित विहिंप-रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने रामनवमी शोभायात्रेचे भव्यदिव्य आयोजन करण्यात आले असून पंचक्रोशीतील ५१ विविध मंडळ, संस्था, संघटनांनी तयार केलेल्या श्रीरामाच्या झाक्या व देखावे सहभागी होणार आहेत.

या शोभायात्रेत थर्म ध्वजासह ११ घोडेस्वार सहभागी होणार आहे. यामध्ये बाल शिवाजी, जिजामाता, महाराणा प्रताप, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, राणी ताराबाई, छत्रपती संभाजी महाराज व अन्य महापुरुषांच्या घोड्यांवर झांकी सादर करण्यात येणार आहेत. तसेच श्रीराम पादुका सह विहिपचा मानाचा श्रीराम दरबार राहणार आहे. धार्मिक तत्त्वावर ५१ विविध धार्मिक झांक्या देखाव्यांसह ५० महिला दिंडी मंडळ, १० पुरुष वारकरी दिंडी मंडळ, ढोल पथक आदींचा समावेश राहणार आहे.

दरम्यान, विहीप रामनवमी शोभायात्रा समितीतर्फे टिळकरोड स्थित मोठ्या राम मंदिरात आज रविवारी सकाळी ८ वाजता श्रीरामाचे पादुका पूजन, अभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. सकाळी ११.३० वाजता जुने शहरातील विठ्ठल मंदिरात मातृशक्तींच्या वतीने जल्लोषात राम जन्मोत्सव साजरा करुन रामनवमी शोभायात्रेसाठी वातावरण निर्माण करण्यात आले.

या शोभायात्रेत रामभक्त महिला पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन गंगादेवी शर्मा, अशोक गुप्ता, विहीप रामनवमी शोभायात्रा समितीचे सर्वसेवाधिकारी कृष्णा शर्मा, रामनवमी शोभायात्रा समितीचे अध्यक्ष शैलेंद्र उर्फ बंटी कागलीवाल, विहिप अध्यक्ष प्रकाश लोढिया, समितीचे कोषाध्यक्ष राहुल राठी, विहिप प्रांत सहमंत्री गणेश काळकर, बजरंग दल प्रांत सहसंयोजक सुरज भगेवार, प्रकाश घोगलिया

तसेच माजी अध्यक्ष विलास अनासने, रामप्रकाश मिश्रा, ब्रिजमोहन चितलांगे, डॉ.अभय जैन, शैलेश खरोटे आणि हरिओम पांडे, नवीन गुप्ता, संदिप निकम, संदीप वाणी, नितीन जोशी,हेमंत शर्मा, अरुण शर्मा, डॉ प्रियश शर्मा, सुमित शर्मा, प्रा.अनुप शर्मा, संतोष पांडे, बाबू बागडे, सुमनताई गावंडे, मंजुषा सावरकर,अर्चना शर्मा, पुष्पा वानखडे, आरती शर्मा,मनीषा भुसारी,रेखा नालट, सारिका देशमुख, चित्रा बापट,कल्पना अडसुले, मालती रणपिसे, आरती शर्मा, संतोष शर्मा,आरती घोगलिया,कल्पना कागलीवाल यांच्यासह विहिंप आणि रामनवमी शोभायात्रा समितीचे समस्त पदाधिकारी, सेवाधारी, रामभक्त, महिला समितीच्या सदस्यांनी केले आहे.
