Monday, April 7, 2025
HomeUncategorizedअमरावतीत 24 वर्षिय युवकाचा खून ! दोघांना घेतले ताब्यात

अमरावतीत 24 वर्षिय युवकाचा खून ! दोघांना घेतले ताब्यात

अकोला दिव्य न्यूज : आपसी वाद उफाळून शाब्दिक चकमक उडाली आणि वाद विकोपाला गेल्याने धारदार चाकूने वार करून एका २४ वर्षाच्या युवकाची हत्या करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. युवकांचे नाव मृतक तेजस उर्फ अनिकेत अविनाश नळकांडे असून तो गोपाल नगर येथील रहिवासी आहे. पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीसह एकाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, अमरावती शहरातील गाडगे नगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नवसारी भागातील अमन पॅलेस जवळ राहणारा मृतक अनिकेत अविनाश नळकांडेसोबत रात्री १० वाजताच्या दरम्यान शेख अकिल सोबत वाद सुरू झाला. शब्दांनी शब्द वाढत गेले आणि वाद आणखी वाढवू लागला. या वादात शेख अकिल शेख कयुम याचा सावत्र मुलगा उमर युनूस चौधरी (20) याने रागाच्या भरात नळकांडेवर चाकू हल्ला केला.

तेजसच्या मांडीत चाकूने वार करून जखमी केले. चाकू हल्यात गंभीर जखमी झालेल्या नळकांडेला जखमी अवस्थेत काही नागरिकांनी उपचारासाठी प्रथम बेस्ट हॉस्पिटलमध्ये नेले. परंतू त्याची प्रकृती गंभीर असल्याचे पाहून, डॉक्टरांनी त्याला इतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास सांगितले. दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असता डॉक्टरांनी तपासणी करून तेजसला मृत घोषित केले.

मृताच्या मुलाने पोलिस ठाण्यात जाऊन सगळा घटनाक्रम नमूद करीत तक्रार दिली. या तक्रारीची दखल घेत फिर्यादीच्या जबानी रिपोर्ट वरुन पो.स्टे. गाडगेनगर येथे अप क्रमांक 286/2025 कलम 103 भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

या प्रकरणात पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने दोन आरोपींना ताब्यात घेतले असून उमर युनुस चौधरी (20) राहणार गुलशन नगर, अमरावती आणि त्याचा मित्र शहजाद खान (28) राहणार सुप्रिया पार्क अमरावती या‌दोघांनाही अमरावती गाडगे नगरच्या पोलिसांच्या ताब्यात दिले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!