अकोला दिव्य न्यूज : अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या उत्थानासाठी शिक्षण विभाग, प्रकाशवाट व दापुरा येथील अन्नपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी प्रथमच सुरू केलेल्या सुपर – 50 क्लासमधून नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये भरघोस यश संपादन करीत 10 विद्यार्थी नवोदय विद्यालयासाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये अकोला जिल्ह्यातील खांबोरा जुना येथील पायल शिरसाट, पियुष शिरसाट, सोपान राऊत, निवृत्ती बावस्कर, तसेच राणी चंडीवाले (चांदूर मराठी), दिव्या शिरसाट (कानशिवनी), प्राची शेगोकार (चिखलगाव), आराध्या चनघोडे (बोरगाव मराठी), जानवी वानखडे (धोतरडी), दिया टेकाडे (दोनवाडा) यांची निवड झाली आहे.

ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या उत्थानासाठी न्यायमुर्ती अनिल किलोर यांच्या संकल्पनेतून प्रकाशवाट संस्थेची निर्मिती झाली. तसेच अकोला जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी बी.वैष्णवी, शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांच्या मार्गदर्शनाने गटशिक्षणाधिकारी श्याम राऊत, शिक्षण विस्तार अधिकारी दीपमाला भटकर आणि प्रभात किड्सचे संचालक तथा प्रकाशवाट संस्था प्रवर्तक डॉ. गजानन नारे यांच्या नियोजनातून सुपर-50 या वर्गाची सुरुवात सप्टेंबर 2024 रोजी प्रभात किड्स स्कूल, अकोला येथील कॅम्पसमध्ये सुरू करून जिल्हा परिषदेच्या गरीब विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांसाठी भोजनाची व्यवस्था अन्नपेढी दापुरा केंद्रातील श्रीकृष्ण गावंडे केंद्रप्रमुख व शिक्षकांनी केली होती.अकोला जिल्हा परिषदेतील होतकरू व तज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन वर्ग शनिवार व रविवारी घेण्यात आले होते. काही विद्यार्थ्यांना अभ्यास सामग्री पुरविण्यात आली.
या सर्व नियोजन व कार्यवाहीचे यश म्हणजे यावर्षी प्रथमच सुरू केलेल्या सुपर फिफ्टी वर्गातील मार्गदर्शनाने 10 विद्यार्थी नवोदय साठी पात्र ठरले आहेत. या विद्यार्थ्यांना नितीन बंडावार (केंद्रप्रमुख सांगळूद) यांच्या समन्वयात भाषा, गणित व बुद्धिमत्ता विषय अध्यापन करणार्या तज्ज्ञ शिक्षकांमध्ये शुभांग पाटील (उगवा), रजनी मेतकर (लोणी), छाया ताथोड (कोळंबी), शिल्पा कांबळे (सांगवी बु.), जयश्री मसुरकर (शिवर), लोड मॅडम ( खरप बु.), छाया तरोडे (निराट), सविता खिल्लारे (म्हैसांग), भारती मडावी (चांदूर), कल्पना डोंगरे (दहिगांव गावंडे), दिव्या बुलबुले (गुडधी), संदिप राहुडकर (खांबोारा), रामेश्वर घोरसडे (डोंगरगांव), प्रशांत देशमुख (सोनखास), सुनिल दिवनाले (माझोड), राम कापरे (सुकळी नंदापुर), नागेश सरतकार (आखतवाडा) आऐ व्ही.अनुराधा (प्रभात किड्स स्कूल, अकोला) यांचे मार्गदर्शन लाभले. या घवघवीत यशाबद्दल या उपक्रमाची सर्वत्र प्रशंसा होत आहे
