Thursday, April 3, 2025
HomeUncategorizedशेगांव मार्गावर विचित्र अपघातात ५ जणांचा मृत्यू तर २४ जण जखमी! एसटी,...

शेगांव मार्गावर विचित्र अपघातात ५ जणांचा मृत्यू तर २४ जण जखमी! एसटी, खासगी बसमध्ये बोलेराचा चेंदामेंदा

अकोला दिव्य न्यूज : Buldhana Accident : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ते शेगाव महामार्गावर आज बुधवार २ एप्रिलला सकाळी सकाळी विचित्र अपघात होऊन ५ जणांना जीव गमवावा लागला आहे. तर २४ जण जखमी असून खामगाव येथील शासकीय रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत.

शेगाव-खामगाव महार्गावर खासगी बस, एसटी बस आणि बोलेरो अशा तीन वाहनांचा अपघात झाला असून तीनही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, आज पहाटे साडेपाचच्या सुमारास भरधाव बोलेरो वाहन पुण्याहून परतवाडाकडे निघालेल्या एसटी बसवर धडकले. त्यानंतर पाठीमागून येणारी खासगी प्रवासी बसही अपघातग्रस्त वाहनांना धडकली. या भीषण धडकेत पाच जणांचा अपघातास्थळीच मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. खामगाव येथील शासकीय रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!