अकोला दिव्य न्यूज : हिंदू धर्मियांचे श्रद्धास्थान मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांचा जन्मोत्सव दरवर्षी प्रमाणे यंदाही जल्लोषात साजरा करण्यात येणार असून यानिमित्ताने येत्या ६ एप्रिल२०२५ रोजी सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव सेवा समितीच्या वतीने अकोल्याचे आराध्यदैवत राजराजेश्वर मंदिर येथून भव्य मोटारसायकल रॅली काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव सेवा समितीची बैठक होऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांची देखील निवड करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षपदी लक्ष्मण पंजाबी, उपाध्यक्षपदी हरिओम पांडे, विकी सिंग बावरी, प्रकाश वानखडे, देवा गावंडे,राज मिश्रा, रोहित काळे तर कोषाध्यक्षपदी निहार अग्रवाल, सचिवपदी सुनील बैस, सहसचिवपदी गोविंद जवादे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांसोबतच राजेश मिश्रा, तरुण बगेरे, संजय अग्रवाल, मंगेश काळे, बंडू सवई, अतुल एळणे,अमोल ठोकणे, सुनील दुर्गिय रोशन राज,शरद तुरकर, धीरज मिश्रा, आशुतोष मिश्रा, गोविंद सिंग, प्रणव वानखडे,मनोज बाविस्कर, आशु पांडव ,मनमोहन दुबे, हरिओम पांडे,अरुण शर्मा, दादाराव खडसणे ,सागर आप्पा कुकडे, संतोष रणपिसे, दीपक शुक्ला, अमित मिश्रा, आशु वानखडे, नंदू डांगे, रोहित काळे, मुन्ना यादव, कैवल्य घुगे, हिमांशू सोनी, सुरज भिडा,मीडिया प्रमुख चेतन मारवालसोबत मोठ्या संख्येने श्रीराम भक्त उपस्थित होते, अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख योगेश गीते यांनी दिली.