अकोला दिव्य न्यूज : भगवान श्रीराम यांच्या समरसता तत्वानुसार सर्व समाजाला आणि तळागाळातील माणसाला सोबतीला घेऊन, विदर्भात नागपूर नंतर सर्वात मोठी शोभायात्रा म्हणून नावलौकिक असलेली अकोला शहरातील श्रीराम नवमी शोभायात्रा दरवर्षी प्रमाणे यंदाही ६ एप्रिल रोजी रामनवमीच्या दिवशी दुपारी ४ वाजता ‘राम राम जय राजाराम……..च्या गजर आणि लाखो रामभक्तांच्या जल्लोषात राजराजेश्वर मंदिरात पादुका पूजन करून शोभायात्रेचा प्रारंभ केला जाणार आहे.

संपूर्णतः धार्मिक व पारंपारिक पद्धतीने निघणाऱ्या शोभायात्रेत श्रीराम चरण पादुकासह विश्व हिंदू परिषदेचा मानाचा श्रीराम दरबार आणि सर्व संप्रदायाच्या 51 विविध धार्मिक झांक्यासह 50 महिला दिंडी मंडळ, 10 पुरुष वारकरी संप्रदाय दिंडी मंडळ, धर्मध्वजासह 11 घोडेस्वार राहणार आहेत. यासोबतच बाल शिवाजी, जिजामाता, महाराणा प्रताप, अहिल्याबाई होळकर, झांशीची राणी लक्ष्मीबाई, राणी ताराबाई, छत्रपती संभाजी महाराज व अन्य महापुरुषांची सजीव झाकी सादर करण्यात येणार आहे.अशी माहिती अग्रसेन भवन येथे पार पडलेल्या या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

शोभायात्रेच्या अनुषंगाने सिटी कोतवाली चौकात येत्या ३ एप्रिलला ‘श्रीकृष्ण व कालिया मर्दन’चा भव्य चलचित्र देखावा सादर करण्यात येणार आहे. या देखाव्याचे आयोजक गुजरात अंबुजा असून कपडा बाजार येथील ब्रिजलाल बियाणी चौकात सुद्धा धार्मिक झाकी साकारण्यात येणार आहे. शोभायात्रेत शहरातील अनेक मान्यवर राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील गणमान्य व रामभक्त सहभागी राहणार असल्याचे यावेळी सांगितले.

१९८६ मध्ये अकोल्यात सुरू झालेल्या या शोभायात्रेला समृद्ध सांस्कृतिक वारसा असून विश्व हिंदू परिषदेची संकल्पना आणि आ. स्व.गोवर्धन शर्मा यांच्या प्रयत्नाने या शोभायात्रेला भव्य दिव्य स्वरूप प्राप्त करून दिले असून यंदाही रामभक्तांसोबत महिला व पुरुषांना लाखोच्या संख्येने शोभायात्रेत उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीराम नवमी शोभायात्रा समितीचे सर्वसेवाधिकारी कृष्णा गोवर्धन शर्मा, श्रीरामनवमी शोभायात्रा समितीचे अध्यक्ष शैलेंद्र(बंटी) कागलीवाल, विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रकाश लोढिया, समितीचे कोषाध्यक्ष राहुल राठी, विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री गणेश काळकर, बजरंग दल प्रांत सहसंयोजक सुरज भगेवार यांनी केले.

अकोला येथील ‘अभ्यंकर मसाला’ च्या संचालकांनी श्रीराम जन्मभूमी ट्रस्ट यांच्याशी पत्रव्यवहार करून, लाडू वितरणाची परवानगी घेऊन, अयोध्या येथील राम मंदिर परिसरात रामनवमीच्या दिवशी लाडूचा प्रसादाचा भोग दाखवून त्यांच्या हस्ते जवळपास १ लाख लाडूचे वितरण केले जाणार आहे. या अनुषंगाने यावेळी त्यांचा श्रीराम नवमी शोभायात्रा समितीतर्फे सत्कार करण्यात आला.
वार्ताहर बैठकीत माजी अध्यक्ष विलास अनासने,रामप्रकाश मिश्रा, डॉ.अभय जैन, शैलेश खरोटे,प्रकाश घोगलिया,विभाग संयोजक हरिओम पांडे, विभाग मंत्री संजय दुबे,विहिपचे जिल्हा मंत्री निलेश पाठक, बाळकृष्ण बिडवई,कोषाध्यक्ष अमर कुकरेजा,उपाध्यक्ष राजु मंजुळकर,अशोक गुप्ता,नविन गुप्ता, संदिप निकम,संदीप वाणी, रोशन जैन,विजय डहाके,प्रताप विरवाणी,आकाश ठाकरे,नितीन जोशी,अरुण शर्मा,डॉ.प्रियश शर्मा,संतोष बुरडे,निलेश नागोसे, मनोज कस्तुरकर,संतोष पांडे,विकी ठाकूर,सुनील कोराडीया,श्रीमती गंगादेवीशर्मा, सुमनताई गावंडे,अर्चना शर्मा,कल्पना कागलीवाल, मीना कागलीवाल,पुष्पा वानखडे,आरती शर्मा,ज्योती टोपरे,मनीषा भुसारी, रेखा नालट,सारिका देशमुख,चित्रा बापट,छाया थोडसं,चंदा ठाकूर,कल्पना अडसुले,मालती रणपिसे,सुरेखा नबापुरे,आरती शर्मा, संतोष शर्मा,आरती घोगलिया,अलका देशमुख,वसुधा बिडवई उपस्थित होते.