अकोला दिव्य न्यूज : जगात सर्वाधिक गणपती मुर्तींचे अद्वितीय संग्रह असलेल्या अकोला तालुक्यातील नंद उद्यान व गणपती संग्रहालयात नंद मित्र मंडळ व नंद संग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने अजून एक ऐतिहासिक उपक्रम यशस्वीपणे पार पडला. गेल्या ५० वर्षांपासून देश आणि विदेशातून संकलित केलेल्या ६५०० गणपती मुर्तींचे संकलन करणारे प्रदिप नंद (गोटू) यांच्या प्रेरणेतून भारतातील सर्वांत मोठी गणपती रांगोळी साकारण्याचा ऐतिहासिक विक्रम नोंदविला गेला.

जवळपास १२,००० स्क्वेअर फूट क्षेत्रफळात, तब्बल 23 तास आणि अडीच हजार किलो रांगोळीचा वापर करून, सुप्रसिद्ध चित्रकार व कलाकार अमृता कुशल सेनाड यांनी गणपतीचा भव्य पोर्ट्रेट रांगोळीच्या माध्यमातून साकारत हा विक्रम प्रस्थापित केला. त्यांच्या अप्रतिम कलाकृतीने गणेशभक्ती आणि रांगोळी कलेचा सुंदर मिलाफ घडवला. हा अनोखा कलाविष्कार पाहण्यासाठी हजारो गणेशभक्त आणि कलाप्रेमींनी गर्दी केली होती. रांगोळीचे सौंदर्य पाहून उपस्थितांनी भारावून जाऊन त्याचे भरभरून कौतुक केले.

सत्कार समारंभाचे विशेष आकर्षण : रांगोळी साकारल्यानंतर एका विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. या समारंभात अमृता कुशल सेनाड यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन डांबळे नंद किशोर यांनी केले.
मंचावर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. माधव देशमुख (व्यवस्थापक), सुधाकर देशमुख, धनंजय तायडे, श्रीकांत देशपांडे, राज पवित्रकार, अविनाश पाटील, आतिकखान पठाण, राजाभाऊ होरे, जितेंद्र इंगळे, आकाश इंगळे, सलीम खान पठाण, उपसरपंच, सरपंच सुशील शिरसाट, सरपंच शाहरुख पठाण, दीपाली नंद, इंद्राणी देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. विशेष आशीर्वादासाठी गुरुजी श्रीकांत आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. कार्यक्रमात सर्व मान्यवरांनी अमृता सेनाड यांच्या कलेचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. माधव देशमुख, सुधाकर देशमुख, धनंजय तायडे, श्रीकांत देशपांडे, राज पवित्रकार, अविनाश पाटील, आतिकखान पठाण, राजाभाऊ होरे, जितेंद्र इंगळे, आकाश इंगळे, सलीम खान पठाण, सरपंच सुशील शिरसाट, सरपंच शाहरुख पठाण आणि नंद मित्र मंडळ यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या शेवटी अविनाश पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. हा ऐतिहासिक क्षण अकोल्याच्या नागरिकांनी अनुभवला, ज्यामुळे अकोल्याच्या नावलौकिकात भर पडली.