अकोला दिव्य न्यूज : राज्यातील 750 लघु उद्योग, व्यापार व सेवा वर्गीय संस्था,संघ आणि असोसिएशनची मातृसंस्था असलेल्या मुंबई येथील फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अर्थात ‘फॅम’ च्या प्रदेश उपाध्यक्षपदी पश्चिम विदर्भातील जेष्ठ उद्योजक आणि अकोला जनता बॅकेचे अध्यक्ष रमाकांत खेतान यांची निवड करण्यात आली असून रमाकांत खेतान यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा राहणार आहे.

मुंबई येथे नुकत्याच संपन्न झालेल्या फॅमच्या प्रदेश निवडणुकीत खेतान यांची प्रदेश उपाध्यक्ष पदावर वर्णी लागली.फॅमचे नूतन प्रदेश अध्यक्ष जितेंद्र शाह व चेअरमन विनेश मेहता यांच्या कार्यकरणीत खेतान समवेत 41 कार्यकारी मंडळ कामकाज बघणार आहे. फॅमच्या मुंबई येथील कार्यालयात संपन्न झालेल्या प्रदेश कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नगीनदास शाह, चंपालाल शाह यांनी कामकाज बघितले.
बहुआयामी व्यक्तिमत्त्व आणि अकोला जनता बँक समवेत अनेक सामाजिक, आर्थिक व व्यापारी संस्थांमध्ये सेवारत रमाकांत खेतान यांच्या निवडीमुळे पश्चिम विदर्भातील लघु उद्योग, व्यापार व सेवा संस्थांच्या समस्या आणि अडीअडचणीचे निरसन होऊन, विविध संस्था आणि असोसिएशनला नवीन चालना मिळून अकोला महानगर राष्ट्रीय स्तरावर नव्याने ओळखल्या जाणार. खेतान यांच्या या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे. अकोला दिव्य परिवाराचे ते जेष्ठ सदस्य असून त्यांचा नियुक्तीबाबत अकोला दिव्य परिवारातर्फे मनस्वी सदिच्छा.