Thursday, March 13, 2025
HomeUncategorizedउद्या धूलिवंदन आहे की रंगपंचमी ? जाणून घ्या दोघांमधील फरक : धुळवड...

उद्या धूलिवंदन आहे की रंगपंचमी ? जाणून घ्या दोघांमधील फरक : धुळवड कशी साजरी केली जाते

अकोला दिव्य न्यूज : Dhulivandan or Rang Panchami Difference, Holi 2025: आज संपूर्ण देशभरात होळी दहन उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. तिथीनुसार होळी ही १३ मार्चला साजरी झाली असली रात्री होळीचा उत्साह व तयारी मात्र आठवड्याआधीच सुरु झाली होती. उद्या शुक्रवार 14 मार्चला सगळ्या तयारीचा अंतिम टप्पा म्हणजेच रंग खेळण्याचा दिवस. मात्र रंग लावून आनंद साजरा करणे ही जरी आता सध्या प्रचलित पद्धत झाली असली तरी रंगपंचमी ही होळी दहनाच्या दुसऱ्या दिवशी साजरी केलीच जात नाही, उद्याचा दिवस हा दिनदर्शिकेनुसार सुद्धा रंग पंचमी नव्हे तर धूलिवंदन म्हणून ओळखला जातो.

आजकाल होळीच्या दुसऱ्या दिवशीच रंग खेळायला सुरुवात झाली आहे. परंतु होळी, धुळवड आणि धूलिवंदन यात नेमका काय फरक आहे. हे तुम्हाला माहित आहे का ? नकळतपणे मराठी माणसांनी उत्तर भारतीय परंपरा स्वीकारल्याने पूर्वापार चालत आलेली खरी धुळवड आणि रंगपंचमी यांचे वास्तविक महत्त्व वेगवेगळे आहेत.

महाराष्ट्रात आज जरी रंग खेळला जात असला तरी परंपरेनुसार उद्या शुक्रवार १४ मार्च हा धुळवडीचा दिवस आहे. अनेकदा या दोन्ही दिवसांमध्ये फरक लक्षात येत नाही, काही जण तर दोन्ही दिवस एकच आहे असेही समजतात. म्हणूनच आज आपण धुलिवंदन/ धुळवड व रंगपंचमीमधील फरक जाणून घेणार आहोत.

धुळवड कशी साजरी केली जाते?
होलिका दहन झाल्यानंतर उरलेली राख एकत्र केली जाते. या राखेने दुसऱ्या दिवशी सकाळी धुळवड खेळली जाते. या राखेमध्ये मातीही समाविष्ट झालेली असते. मित्रमंडळी एकमेकांच्या अंगावर राख लावून हा सण साजरा करतात. कोकणात गावी आजही अशा प्रकारे धुळवड खेळली जाते. धुळवड हा बोलीभाषेतील शब्द झाला असून त्याला ‘धूलिवंदन’ सुद्धा म्हटले जाते.

धुळवड व रंग पंचमीमध्ये फरक काय?
पंचांगानुसार, फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवशी मूळ ‘रंगपंचमी’चा उत्सव साजरा केला जातो. खऱ्या अर्थाने या दिवशी रंग खेळण्याची आपल्याकडे पद्धत आहे. होलिका दहनानंतर येणारा रंगोत्सव म्हणजेच ‘रंगपंचमी’ अजूनही काही गावात पाच दिवसांनी साजरा केला जातो. त्यानुसार यंदा १४ मार्चला रंग पंचमीची तिथी आहे.

धूलिवंदन व रंग पंचमीमध्ये संभ्रम का?
उत्तर भारतामध्ये विशेषतः मथुरा वृंदावन, उत्तर प्रदेश या भागांमध्ये होळी विविध स्वरूपात साजरी होते. राखेची होळी ते फुलांची होळी, लठमार होळी ते रंगांची होळी असे अनेक प्रकार या भागात पाहायला मिळतात. पण होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी तिथे रंग खेळले जातात. या परंपरेचा प्रभाव महाराष्ट्रातही होत गेला आणि धुलिवंदनाच्या दिवशी रंग खेळण्याची सवय लोकांना झाली. यामुळे धुळवड आणि रंगपंचमी याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. पण मुळात तिथीनुसार उद्याचा दिवस हा रंगपंचमी नसून धुलिवंदनाचा आहे.

बाकी तुम्हाला सर्वांना या सणाच्या खूप खूप शुभेच्छा !

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!