Wednesday, March 12, 2025
HomeUncategorized३२ आचार्यांना समाजभूषण पुरस्कार ! रविदास यांच्या दोह्यामध्ये भारतीय घटनेचे प्रतिबिंब दिसून...

३२ आचार्यांना समाजभूषण पुरस्कार ! रविदास यांच्या दोह्यामध्ये भारतीय घटनेचे प्रतिबिंब दिसून येते -प्रा.बोरकर

अकोला दिव्य न्यूज : आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगासोबत झपाट्याने बदलत चाललेल्या जीवन शैलीत तथागत गौतम बुध्द व संत शिरोमणी रविदास या महानुभवांच्या विज्ञानवादी व वास्तववादी विचारांचा प्रचार व प्रसार होणे आवश्यक होते आहे. वास्तविकता आणि जीवन यांची योग्य सांगड घालून देण्यासाठी, चर्मकार समाजातील उच्चशिक्षीत मंडळीने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत प्राचार्य डॉ. गणेश बोरकर यांनी व्यक्त केले. महिलादिनाचे औचित्यसाधुन ज्येष्ठ नागरिक विचार मंच अकोलाच्या वतिने सम्यक संबोधी सभागृहात आयोजीत समाजभूषण पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य प्रभु चापके होते.

सोहळ्याचे औपचारिक उद्घाटन करुन पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना सेवानिवृत्त उपकुलसचिव रामभाऊ शेगोकार यांनी ज्येष्ठ नागरिक संघाची भुमिका व उपक्रमाविषयी माहिती दिली.पाहुण्याच्या हस्ते आचार्य पदवीप्राप्त डॉ.कांचन शेगोकार, डॉ.विठ्ठल चोपडे, डॉ.स्नेहल चिमणकर डॉ.प्रिती चापके, डॉ. सोनाली चापके, डॉ.जया वझिरे, डॉ.प्रेमलता चंदन, डॉ.ज्योती शेगोकार, डॉ.संगिता शेगोकार, डॉ. सोनाली नाचणे यांचा सत्कार करण्यात आला. तर डॉ.प्रविण इंगळे, डॉ.महेश तुंबडे, डॉ.अविनाश थोटे, डॉ.विवेक चापके, डॉ.उमेश चापके डॉ.संजय टाले, डॉ.गजानन डोईफोडे, डॉ.राजकुमार वझिरे, डॉ.आप्पा डामरे, डॉ.प्रदिप डामरे , डॉ.धनंजय खिराडे, डॉ.संतोष सुरडकर, डॉ. निलेश वझीरे, डॉ. गजानन वझीरे, डॉ. सुनिल पटके, डॉ. ओमप्रकाश राखोंडे, डॉ. नितीन पतके यांच्यासह चर्मकार समाजातील उच्चशिक्षीत जवळपास ३२ आचार्यांना समाजभूषण पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात माजी प्राचार्य प्रभु चापके यांनी राष्ट्रीय शैक्षणीक धोरणामध्ये रोजगार निर्मिती कुठेही दिसत नाही या बाबत चिंता व्यक्त केली. ज्येष्ठ नागरीक विचार मंचाचे अध्यक्ष रामभाऊ ताजने, माजी प्राचार्य निर्मला भामोदे, माजी प्राचार्य विजय काकडे व राम गव्हाळे यांची या प्रसंगी समोचीत भाषणे झालीत.

कार्यक्रमाचे संचालन मधुसुदन गव्हाळे व आभार आर.एम.शेगोकार यांनी केले. यावेळी निंरजन गव्हाळे, मधुकर वानेटकर, के.टी.पदमने, चापके, सौ.गव्हाळे, टाले यांच्यासह चर्मकार समाजातील प्रतिष्ठीत व ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त अधिकारी मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!