अकोला दिव्य न्यूज : विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर माहेश्वरी कपल क्लबच्या पुढील २ वर्षाच्या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची अविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदी आरती व योगेश बाहेती आणि सचिवपदी दिपाली व आनंद सोमाणी या दाम्पत्याची अविरोध निवड झाली. आय.एम.सी.सी क्लबचा पदग्रहण समारंभ माहेश्वरी भवन येथे माहेश्वरी समाज ट्रस्टचे अध्यक्ष विजय पनपालिया यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि आय.एम.सी.सी महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव कांचन सुनिल नावंदर यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न झाला. समारंभाची सुरुवात दिप प्रज्वलनाने करण्यात आली. वर्ष 2023-24 चे अध्यक्ष मोनिका व गिरीश तोष्णीवाल यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची प्रोजेक्टरद्वारे माहिती दिली. तसेच त्यांच्या कार्यकाळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कार्यकारिणी सदस्यांचा स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला

यानंतर नवीन अध्यक्ष आरती व योगेश बाहेती दाम्पत्यांना पुढील कालावधीसाठी अध्यक्षपद सोपविण्यात आले. त्यांनी आपली नवीन कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये उपाध्यक्ष प्रीति कमल मालू आणि मीरा गोविंद बजाज, सचिवपदी दिपाली आनंद सोमाणी, सह सचिव रचना परेश कोठारी, कोषाध्यक्ष सीमा संतोष राठी तर जनसंपर्क अधिकारी म्हणून लीना पंकज मणियार, आरोग्य संचालक आरती डॉ कपिल लढ्ढा, स्पोर्टस डायरेक्टर पल्लवी रोहित गांधी आणि कल्चरल अॅक्टिविटी डायरेक्टर उज्वला शाम पनपालिया व स्पिरिचुअलिटी आरती निलेश सारडा यांची निवड करण्यात आली. पाहुण्यांनी पुष्प गुच्छ देऊन यांचे स्वागत करुन पदासिन केले.
माहेश्वरी कपल क्लबची स्थापना 2008 मध्ये इंग्लंड येथे करण्यात आली आणि त्यानंतर संस्थापक अध्यक्ष कंचन सुनील नावंदर आणि संस्थापक सचिव श्वेता निशित गांधी व 15 माहेश्वरी कपल यांनी अकोला येथे 2018 मध्ये स्थापन केली. आपल्या कार्यकाळात मोनिका व गिरीश तोष्णीवाल यांनी अध्यक्ष तर आरती व योगेश बाहेती यांनी सचिव म्हणून काम करताना माहेश्वरी कपल क्लबला एक नवीन उर्जा निर्माण करुन दिली. जवळपास ४० पेक्षा जास्त माहेश्वरी कपल सोबत मिळून अनेक प्रकल्प यशस्वी केले. त्यामध्ये महेश नवमीची झाकी, रक्तदान आणि गो शाळेसाठी कार्य, आरोग्य शिबीर, उज्जैन दर्शन, जुन्या कपड्यांचं संकलन आणि वितरण, तिज सिंजारा इव्हेंटसह आध्यात्मिक, बौद्धिक, सांस्कृतिक असे अनेक समाजोपयोगी कार्य केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अर्चना संतोष भट्टड, आभा अजय झंवर, स्मिता संजय अटल, पूजा सतीश तोष्णीवाल, शिल्पा राजेश चांडक, सुवर्णा आशीष सारडा,मीना संजय गांधी, विजया दिनेश सोनी, पूर्ती आनंद फाफट, दुर्गा अंकुश तोष्णीवाल, प्रेमवती प्रसन्न पोरवाल,उषा शीतल लढ्ढा,सविता शाम टावरी, प्रेरणा जय प्रकाश चांडक,शीतल प्रशांत मानधने, जया गजानन चांडक, निशमा अमित सोमाणी रश्मी वसंत भाला,सोनल नीरज तापडिया, मनीषा मनीष डांगरा यांनी परिश्रम घेतले. यावेळी माहेश्वरी तहसील संघटन अध्यक्ष जय प्रकाश चांडक, माहेश्वरी वरिष्ठ महिला प्रकोष्ठ अध्यक्ष प्रमिला रमण लाहोटी, सचिव वीना विजय राठी, महेश्वरी महिला मंडल अध्यक्ष शिल्पा सुनील चांडक आणि मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. संचालन नूतन सचिव दिपाली सोमाणी तर आभारप्रदर्शन सचिव आनंद सोमाणी यांनी केले.