अकोला दिव्य न्यूज X Down Worldwide: एलॉन मस्क यांच्या मालकीच्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आज दुपारी जगभरातील हजारो युजर्सना ते वापरण्यास समस्या निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी युजर्सना मोठ्या प्रमाणात कनेक्टिव्हिटीच्या समस्येच सामना करावा लागला. डाउन डिटेक्टर वेबसाइटनुसार, सोमवारी दुपारी ३:१५ च्या सुमारास एक्सवर व्यत्यय आल्याबद्दलच्या असंख्य तक्रारी नोंदल्या गेल्या होत्या. डाउनडिटेक्टरच्या मते, भारतात सुमारे २०००, अमेरिकेत १८,००० आणि युकेमध्ये १०,००० लोकांनी ही समस्या नोंदवली. सध्या, या समस्येबद्दल एक्स कंपनीकडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.

Downdetector च्या यूएस डेटावरून असे दिसून आले की, अमेरिकेत ५७% युजर्सना एक्स वापरण्यात समस्या येत होत्या, ३४% युजर्सनी वेबसाइटमध्ये समस्या असल्याचे म्हटले तर ९% युजर्सनी सर्व्हर समस्या असल्याच्या तक्रारी नोंदवल्या. युकेमध्ये, ६१% युजर्सना अॅपबद्दल, ३४% युजर्सनी वेबसाइटबद्दल आणि ५% युजर्सना सर्व्हर समस्यांचा सामना करावा लागला.
दरम्यान, X प्लॅटफॉर्मवरील या समस्येबद्दल कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण, काही वेळानंतर मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्स पुन्हा सुरळीत सुरू झाले आहे. मात्र, या समस्येमुळे हजारो युजर्सनी संताप व्यक्त केला आहे.