Wednesday, March 12, 2025
HomeUncategorizedमराठा पाटील संघटना बाळापुरचा अध्यक्षपदी शरद वानखडे यांची निवड

मराठा पाटील संघटना बाळापुरचा अध्यक्षपदी शरद वानखडे यांची निवड

अकोला दिव्य न्यूज : मराठा पाटील समाजातील विविध समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि समाजहितासाठी विविध उपक्रम राबविण्यात अग्रेसर अकोला मराठा पाटील संघटना बाळापूरचा अध्यक्षपदी अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपमुख्याधिकारी शरद नारायणराव वानखडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

मराठा पाटील समाजातील विविध विषयावर काम करणारी एकमेव अराजकीय संघटना बाळापुर तालुक्यात सहा महिन्यापूर्वी स्थापन करण्यात आली होती. या संघटनेच्या अध्यक्षपदी राजदत्त मानकर यांची निवड करण्यात आली होती. परंतु नुकतेच त्यांचे अपघाती निधन झाले. तेव्हा कामकाज सुरळीत होण्यासाठी संचालक मंडळाने बाळापूर येथे आयोजित केलेल्या बैठकीत सर्वानुमते शरद वानखडे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर प्रा.राजदत्त मानकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पदावर योगेश मानकर यांची निवड करण्यात आली तसेच प्रसिद्धिप्रमुखपदी देवानंद साबळे यांनी निवड करण्यात आली.

सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे ज्येष्ठ सदस्य शशिकांत नकासकर तर प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ पत्रकार रमेश ठाकरे, रामदास वानखडे प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वप्रथम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजदत्त मानकर व माजी आमदार तुकाराम बिडकर यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. राजदत्त मानकर यांनी संघटनेच्या माध्यमातून त्रिसूत्री कार्यक्रमाचा नियोजन केले होते संघटनेच्या माध्यमातून शेती शिक्षण आरोग्य हे विषय प्रामुख्याने घेण्यात आले असून पुढील काळात हे विषय आपण प्रामुख्याने तडीस घेऊन जाऊ व ज्या समस्या असतील त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन नवनिर्वाचित अध्यक्ष शरद वानखडे यांनी दिले.

कार्यक्रमास संघटनेचे सचिव मधुसूदन माळी, उपाध्यक्ष हिम्मत मेटांगे, मोहनराव सरप, वसंतराव पोहरे, मधुसूदन टीकार, प्रशांत गायकवाड, रुपेश पटोकार, धनंजय नेमाडे ,नारायण मानकर, दत्ता पाटील मांगटे अशोक नळकांडे, देवानंद साबळे, गणेश मुरूमकार , महेश लांडे, सुनील आखरे, पुरुषोत्तम मांगटे पाटील, प्रशांत मानकर , दीपक पोहरे ,ज्ञानेश्वर काळे ,विठ्ठलराव माळी, प्रशांत तेजराव गायकवाड, पवन गाडे, उद्धवराव लांडे ,गणेश माळी ,विष्णू पाटील दांदळे, जगदीश हागे,अजय कराळे,अमोल माळी अनिल वैराळेसह समाजातील गणमान्य व्यक्ती उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे संचालन सुभाष घोगरे तर आभार विठ्ठल नळकांडे यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!