अकोला दिव्य न्यूज : अकोला गार्डन क्लब या संस्थेची नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गार्डन क्लबचे अध्यक्ष म्हणून संजय शर्मा यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. गेल्या वर्षीचे अध्यक्ष जयप्रकाश पाटील मुरूमकर यांनी छोटेखानी कार्यक्रमांमध्ये अध्यक्षपदाची सूत्रे संजय शर्मा यांच्याकडे सुपूर्द केली.याच सभेमध्ये नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून सुधीर राठी व शरद कोकाटे तर सचिव म्हणून श्याम गोटफोडे व सहसचिव म्हणून वैशाली पाटील व दिनेश पारेख तसेच कोषाध्यक्ष म्हणून सुधीर रांदड व सहकोषाध्यक्ष म्हणून सुनील कवीश्वर यांची निवड करण्यात आली आहे.

कार्यकारणी सदस्यांमध्ये आलोक खंडेलवाल,अर्चना सापधारे, ब्रिजमोहन चितलांगे, शारदा बियाणी, संजय श्रावगी, संजय आगाशे, संजय हेडा, संदीप महल्ले, निशिकांत बडगे, जयेश जगड, सागर प्रधान, हरीश मालपाणी, नरेश अग्रवाल, संतोष अग्रवाल, गजानन मालोकार, राजेश लोहिया, कोकिळा पाटील, प्रसिद्धी प्रमुख म्हणून नीरज आवंडेकर, भूषण ताजने काम बघणार आहेत. निमंत्रित सदस्य म्हणून रवी खंडेलवाल, जयप्रकाश पाटील व योगेश खंडेलवाल यांची निवड करण्यात आली.

नवनियुक्त कार्यकारिणीचा कालावधी मार्च 2025 ते फेब्रुवारी 2027 असा दोन वर्षांचा असून यावेळी पहिल्यांदाच महिला विंगची स्थापना करून त्याच्या प्रमुखपदी अनुराधा ढवळे तर युथ विंगच्या प्रमुखपदी पल्लवी निखिलेश दिवेकर यांची निवड झाली आहे.जेष्ठ मार्गदर्शक म्हणून अजय सेंगर कार्यरत असतील.
52 वर्षांपूर्वी अकोल्यातील सुप्रसिद्ध विधिज्ञ भु. ना. मुखर्जी व त्यांच्या मित्रांनी मिळून अकोला गार्डन क्लब या संस्थेची स्थापना केली होती. ज्या अंतर्गत वृक्ष संवर्धन, वृक्ष संगोपन, पुष्प प्रदर्शनी, टेरेस गार्डन, किचन गार्डन, इत्यादी गार्डनशी संबंधित विषयांमध्ये अकोलेकरांची रुची वाढावी म्हणून प्रयत्न केले गेलेत. मागील 52 वर्षापासून अकोल्यात एका पुष्पप्रदर्शनीच आयोजन करण्यात येतं. सुरुवातीला छोट्या स्वरूपातील ही पुष्प प्रदर्शनी आता भव्य दिव्य स्वरूपात होते. सर्वचजण या पुष्प प्रदर्शनीची आतुरतेने वाट बघत असतात.मागील अनेक वर्षापासून वृक्ष संवर्धन व वृक्षसंगोपनाच काम करीत असणारे संजय शर्मा यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने या वर्षभरात गार्डन क्लब अधिक उपक्रम राबविण्यात येणार,अशी आशा व्यक्त होत आहे.

अकोला गार्डन क्लबद्वारे जून ते ऑक्टोंबरमध्ये अकोला जिल्हा व शहरातील गार्डन व पुष्प प्रेमी नागरिकांसाठी किचन टेरेस व बाल्कनी गार्डन निर्मिती व सुयोग्य व्यवस्थापन, शेवंती लागवड व जोपासना, गुलाब संगोपन व संवर्धन, अँडेनियम संगोपन व संवर्धन, बोन्साय निर्मिती संवर्धन, पुष्प रचना, व जीवनावश्यक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची लागवड व जोपासना इत्यादी विषयांसाठी तज्ज्ञांद्वारे कार्यशाळा आयोजित केल्या जातील. कार्यशाळा प्रमुख विजय ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होतील.
आमसभेत गार्डन क्लबचे ज्येष्ठ सदस्य हनवाडीकर, यु.टी. ठाकरे, गजानन कोंडोलीकर तसेच सदस्यअनिल मुंदडा, शाम तिबुडे, माधव पाटील, संकल्प गजघाटे, शारदा डोंगरे, संजय पिंपरकर, मीना अनासने, सुनिता शर्मा, अलका सिंगर, दीपक शर्मा, उद्धवराव ठाकरे, अमित राठी, नंदकिशोर थूटेयांच्यासह गणमान्य व्यक्ती उपस्थित होते.येणाऱ्या वर्षात अकोला गार्डन क्लबच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. वर्षाच्या शेवटी भव्य पुष्पप्रदर्शनीचे आयोजन असेल असे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय शर्मा यांनी यावेळी सांगितले.अकोला दिव्य परिवारातर्फे नवीन पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांना पुढील वाटचालीसाठी मनस्वी सदिच्छा.