अकोला दिव्य न्यूज : माहेश्वरी समाजातील प्रतिष्ठित नागरिक आणि जुन्या पिढीतील प्रथितयश अकाऊटंट राधेश्याम रामजिवन लढ्ढा यांचे आज बुधवार ५ मार्चला वयोमानाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, मुलगी आणि नात नातवंडासह मोठे आप्त परिवार आहे. मृत्यू समयी त्यांचं वय ८७ वर्षांचे होते. ते सीताराम लढ्ढा यांचे लहान बंधू आणि कुंज बिहारी लढ्ढा यांचे मोठे भाऊ होते. माहेश्वरी समाज ट्रस्ट अकोला या संस्थेचे माजी ट्रस्टी आणि कपिल एजन्सीचे संचालक व बिकानेर येथील सुप्रसिद्ध अग्रवाल 420 पापड आणि फरसाण तसेच गुरुजी थंडाई या कंपनीचे वितरक वसंत लढ्ढा त्यांचे मोठे पुत्र आहेत.

जुन्या काळातील वहिखाते (अकाऊंट) करणारे अकोला शहरात बोटावर मोजता येतील इतकेच तज्ज्ञ अकाउंटपैकी राधेश्याम लढ्ढा एक होता. महत्वाचे म्हणजे येथील कोठडी बाजारातील त्या काळात ख्यातनाम व्यावसायिक स्व.लक्षमणदास गर्ग यांचे लाहोरीमल प्यारेलाल या प्रतिष्ठानाचे ते अकाउंटंट होते आणि याचं ठिकाणी तब्बल 50 वर्षे ते कार्यरत होते. एकाच ठिकाणी एक व्यक्ती 50 वर्षे कार्यरत राहू शकतो, हे आजच्या पिढीला दिवा स्वप्न वाटेल.
टिळक रोडवरील मोठ्या राम मंदिर मागील रामनगर येथील त्यांच्या राहत्या निवासस्थानावरुन त्यांची अंतिमयात्रा उद्या गुरुवार 6 मार्चला सकाळी 9:30 वाजता मोहता मिल मोक्षधामसाठी निघणार आहे. अकोला दिव्यसोबत त्यांचे कौटुंबिक संबंध होते. त्यांच्या निधनाने जुन्या काळातील शिस्त, संयमी आणि मार्गदर्शक व्यक्तीमत्व लोप पावले आहे. अकोला दिव्य परिवारातर्फे भावपूर्ण आदरांजली.
