गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : वित्तीय व गुंतवणूक क्षेत्रात उच्च पगाराचे करिअर घडविण्यासाठी आयबी,पीसी, पीएमएस (IB/PE/PMS) हे व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध असून पदवी घेण्यासोबत कौशल्ये विकसित करणे आणि अनुभव घेणे देखील महत्त्वाचे आहे. या क्षेत्रात गुंतवणूक व्यवस्थापक म्हणून क्लायंट किंवा संस्थांच्या वतीने गुंतवणूक निर्णय घेणे. वित्तीय व्यवस्थापक वा सल्लागार म्हणून काम करणे किंवा स्वयंरोजगार करणे.तसेच आर्थिक व्यवस्थापन, ऑडिटिंग कर आकारणी आणि नियामक अनुपालनातील तज्ञ असणे, ग्राहकांच्या आर्थिक उद्दिष्टांचे नियोजन करणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे, अशा विविध भूमिका तुम्ही भूषवू शकता.मात्र पैश्याची म्हणजे आर्थिक अडचणींमुळे अनेक होतकरू विद्यार्थ्यांना यापासून वंचित राहावे लागत.

नेमकी ही गोष्ट लक्षात घेऊन देशातील ख्यातनाम मुंबई येथील फिनॅकल इन्स्टीट्यूट (Finnacle Institute) कडून अशा होतकरू विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी National Finance Scholarship Test आयोजित करण्यात येते. त्याप्रमाणे यंदा देखील National Finance Scholarship Test 2.0 आयोजित करण्यात आली आहे. यामाध्यातून आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना वित्तीय आणि गुंतवणूक क्षेत्रात करिअर करण्यासाठीचे मार्ग मोकळा करून देत आहे.
National Finance Scholarship Test मध्ये सहभागी होण्यासाठी शैक्षणिक पात्रता ही किमान 12 वी उत्तीर्ण आणि त्याहून अधिक शिक्षण (पदवी) असणं आवश्यक असून National Finance Scholarship Test मध्ये Top 10 आलेल्या विद्यार्थ्यांना फिनॅकल इन्स्टीट्यूटकडून संपूर्ण शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येईल.यासोबतच वित्तीय आणि गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण संस्थेकडून मोफत देण्यात येईल. शिक्षण आणि प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर क्लिअरिंग प्रोग्रामवरील सुरुवातीचे वेतन INR 7.5 ते 16.5 LPA दरम्यान असते.

National Finance Scholarship Test 2.0 सुरत आणि मुंबईमध्ये ऑफलाईन आणि इतरत्रही ऑनलाईन असून 12 वी राज्य बोर्ड आणि पदवीधरांसाठी 16 मार्च 2025 तर 12वी CBSE बोर्डासाठी 31 मार्च 2025 रोजी ही स्पर्धा परीक्षा होणार आहे.अर्ज भरण्याची शेवटची तारीख 5 मार्च 2025 असून अर्ज करण्यासाठी आणि अधिक जाणून घेण्यासाठी मोबाईल नंबर 95120 38105 कॉल करा अथवा व्हाट्सअॅप क्रमांक 6355043018/ वेबसाइट: www.finnacleinstitute.com वर क्लिक करा.असे आवाहन Finnacle Institute चे संचालक व अकोल्याचे सुपुत्र शैलेश नरेंद्र भाला यांनी केले आहे.