अकोला दिव्य न्यूज : महाराष्ट्रातील गुन्हेगारांवर कायद्याचा वचक राहिला नाही. तर जंगल राज सुरू आहे. महिलांची सुरक्षा आणि पावित्र्य धोक्यात आली असून गुन्हेगारांची हिम्मत एवढी वाढली आहे की, चक्क भाजपाच्या केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड काढण्यात आली आहे. मुलीची छेडछाड काढल्यानंतर रक्षा खडसे या थेट पोलिस ठाण्यात पोहोचल्या आहेत.

काही टवाळखोर मुलांनी खडसे यांच्या मुलीच्या मनाविरोधात फोटो काढली. छेडछाड करणाऱ्या चार मुलांच्या विरोधात पोलिस गुन्हा दाखल करण्यात आलाय. रक्षा खडसे यांच्या मुलीसोबतच इतरही मुलींची छेडछाड या मुलांनी केली असल्याचे रक्षा खडसे यांनी म्हटले आहे. ज्या मुलाने छेड काढली, त्याच्यावर अगोदरच चार गुन्हे दाखल आहेत.
या घटनेबद्दल बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, अशा घटना दुर्देवी आहेत. मुक्ताईनगरच नाही तर राज्यभरात अशा घटना घडत आहेत. ज्यावेळी माझ्या नातीने मला हे सांगितले त्यावेळी मी तिला सांगितले की, तू स्वत: जाऊन तक्रार कर. कारण अशा घटनांमध्ये मुली तक्रार करायला घाबरतात म्हणूनच मी तिला पाठवले. पोलिसांनी या गुंडांना थांबले तर त्यांनी पोलिसांना देखील मारहाण केली. महायुतीच्या आमदारांकडून हा गुंडांना पाठबळ मिळतंय.

रोहिणी खडसे याबद्दल बोलताना म्हणाल्या की, राज्यात दडपशाही आणि गुंडगर्दी वाढली आहे. महायुतीचे मंत्री या गुंडांना साथ देत आहेत. एका मंत्र्यांचीच मुलगी जर सुरक्षित नसेल तर सामान्य नागरिकांच्या महिला मुली या कशा सुरक्षित राहणार हा एक मोठा प्रश्न आहे प्रशासनाने महिलांसंदर्भात एक कडक कायदा लागू करावा अशा टवाळखोरांना या कायद्याचा धाक राहील नाहीये. कडक कारवाई ही केली पाहिजे.