Friday, January 31, 2025
HomeUncategorizedआता समाजाला प्रोफेशनल सोशल वर्करची गरज भासवणार - मुख्यमंत्री डॉ.सावंत

आता समाजाला प्रोफेशनल सोशल वर्करची गरज भासवणार – मुख्यमंत्री डॉ.सावंत

•प्रा.डॉ.बोरकर लिखित ‘महिलांचे हक्क व कायदे’ पुस्तकाचे विमोचन.

अकोला दिव्य न्यूज : सर्वंच क्षेत्रात झपाट्याने बदल होत असून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून केली जाणाऱ्या समाजसेवेचे संदर्भ देखील बदलले आहेत.आता व्यावसायिक दृष्टीने समाजाला समाज सुधारकांची मोठ्या प्रमाणावर गरज भासणार आहे. असे प्रतिपादन गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

पुस्तकाचे प्रकाशन करताना मुख्यमंत्री सावंत..

नागपूर येथे वणावत सभागृहात आयोजित मास्वे अर्थात महाराष्ट्र समाजकार्य प्राध्यापक संघटनेच्या राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन सोहळ्यात प्रा.डॉ.गणेश बोरकर लिखित महिलांचे हक्क व कायदे या पुस्तकाचे विमोचन प्रसंगी मुख्यमंत्री सावंत बोलत होते. ते पुढे म्हणाले, सहयोगी प्राध्यापक डॉ.गणेश बोरकर लिखित महिला हक्क व कायदे पुस्तक स्पर्धा परीक्षा आणि समाजकार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक म्हणून उपयुक्त ठरेल.

गोव्याचे मुख्यमंत्री समाजकार्य पदवी प्राप्त आहेत त्यांच्या हस्ते या विद्याशाखेचे पुस्तकाचे विमोचन होत आहे याबद्दल आनंद वाटतो, असे प्रा. बोरकर यांनी यावेळी सांगितले. डॉ. गणेश बोरकर माजी प्राचार्य व सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत असून महिला हक्क व कायदे हे त्यांचे तिसरे पुस्तक प्रकाशित झाले आहे.प्रा. डॉ.गणेश बोरकर पीएचडी मार्गदर्शक आहेत.यावेळी राज्यभरातील समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!