• शनिवारपासून तीन दिवस जल्लोष •
अकोला दिव्य न्यूज : बांधकाम व स्थापत्य क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती सर्व सामान्य माणसाला माहिती मिळवून देण्यासाठी असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स, अकोला व द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ॲडव्हान्समेंट इन मटेरियल अँड प्रॅक्टिसेस इन कंट्रक्शन टेक्नॉलॉजी अर्थात रॅम्पकॉन प्रदर्शनीचा प्रारंभ उद्या शनिवार 25 जानेवारीपासून स्थानीय मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात होत असून ही प्रदर्शनी 27 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.
यंदा या प्रदर्शनीचे मुख्य आकर्षण दस्तुरखुद्द “बिग बी” अमिताभ बच्चन ज्यांची सदैव प्रशंसा करतात असे “ज्युनिअर अमिताभ बच्चन” हे राहणार असून त्यांच्या उपस्थितीत ही प्रदर्शनी साकार होणार आहे.
प्रदर्शनीत बांधकाम क्षेत्रातील नवीनतम तंत्रज्ञान, साहित्य, डिझाईन, सेवा यांचे दर्शन घडणार असून 100 पेक्षा जास्त स्टॉल्स असून यात सिमेंट, काँक्रीट, प्लंबिंग, टाइल्स, हार्डवेअर, फर्निचर, सजावट साहित्य, गृहनिर्माण योजना, फायर फायटिंग सिस्टीम्स, इंटीरियर डिझाईन, क्रॅक रिपेअर तंत्रज्ञान,पर्यावरणपूरक बांधकाम पद्धती, वित्तीय व्यवस्थापन समवेत गृहपयोगी विषयाचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. या प्रदशनीत बांधकाम व स्थापत्य क्षेत्रातील तज्ज्ञांची व्याख्याने व चर्चासत्रे होणार असून यातून उद्योजक, कंत्राटदार, अभियंते, आर्किटेक्ट, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांना बांधकाम विश्वाचे नवीन ज्ञान मिळणार आहे.
या तीन दिवसीय प्रदर्शनीला सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन लाभ घ्यावा असे आवाहन आयोजन सचिव अभिजित परांजपे,एसीसीई चे चेयरमेन श्यामसुंदर साधवानी,एसीसीईचे सचिव अनुराग अग्रवाल, एसीसीईचे कोषाध्यक्ष रिझवान कुरेशी,एसीसीई केंद्रीय समिती सदस्य पंकज कोठारी, इस्माईल नजमी,आयआयए केंद्रीय सदस्य सुमित अग्रवाल,आयआयए चेअरमन कमलेश कृपलानी,सचिव सर्वेश केला,कोषाध्यक्ष मनीष भुतडा,एसीसीएई व आयआयएचे अजय लोहिया, मनोज मोदी, संजय भगत,नरेश अग्रवाल,ईश्वर आनंदानी, जयप्रकाश राठी,अतुल बंग,शैलेश वखारिया, किरण देशपांडे,चन्द्रशेखर मुखेडकर, अमित राठी, मयूर सिंघानिया,राजेश लोहिया, कपिल ठक्कर,श्याम ठाकूर, निलेश मालपाणी, इंद्रनील देशमुख,अमित राठी,सागर हेडा,नरेंद्र पाटील, पंकज कासट,श्रीकांत धनोकार,विक्रम केजरीवाल, प्रतीक भारंबे,संजीव जैन,प्रकाश ठोकळ, सुनील गुल्हाने, शैलेश मोदी,सय्यद अलाउद्दीन, एम चांदुरकर,शैलेश अग्रवाल, विशाल तडस, बजरंग अंभोरे,नरेश चौधरी, मिलिंद जोत,
आयुष गुप्ता,शुभाश्री धनोकार, पियुशा जैन, रोहन चोपडे, ऋषभ रघुवंशी,रोहन काटकोरिया, निखिल गावंडे,नेहा भैया,गौरव साधवानी, कुशल जैन, सागर हेडा,पवन अलसेट,निखिल बजाज,शिवाजी भोरे,श्रेयस सावजी, गौरी शर्मा,निराग हेडा प्रदीप अग्रवाल, संजय अग्रवाल, गिरीश गुप्ता,पंकज भटकर, शिरीष वरणकार, राजेश घटाळे,अमोल महाजन,राजेश राऊत,अमित फोकमारे, प्रतीक भारंबे, निखिल बजाज,अंकुश खंडेलवाल आदीनी केले.