• सा विद्या या विमुक्तये वार्षिकंकाचे थाटात विमोचन •
अकोला दिव्य न्यूज : आमच सगळं शिकवण म्हणजे पोट भरण्याची विद्या असत, पोट भरायची विद्या तिज म्हणू नये मग सद् विद्या कोणती ? ज्या विद्येतून मानवाची, समाजाची, राष्ट्राचे पुनर्निर्माण करणारी उत्क्रांतीचे जे शास्त्र आहे ते म्हणजे “सा विद्या या विमुक्तये” हे तत्व विद्या भारतीने तुमच्या आमच्या मनात रुजवण्याचे काम करते आहे. विद्या भारतीने जे तत्व, धोरण, नीती, भूमिका सांगितली त्याची निरूपण पत्रिका या ठिकाणी प्रकाशित केली आहे. ही नुसती स्मरण करून देणारी स्मरणिका नाही तर ही निरूपण पत्रिका आहे. कधी आपण कीर्तनाला गेले असाल तर त्यामध्ये निरूपण हा पूर्वार्धात असतो. आणि उत्तरार्धात कथा भाग असतो. निरूपण म्हणजे निश्चित स्वरूप विद्या भारतीने या वार्षिक अंकातून दिल आहे. जर आम्हाला कोणी विचारलं उद्याच राष्ट निर्माण करणार प्रारूप कोणत असेल तर आम्ही सरळ विद्या भारती कडे बोट दाखवू, असं प्रतिपादन विदर्भाचे प्रसिध्द वक्ते, विचारवंत, अभ्यासक, अध्ययनशील लेखक डॉ. कुमार शास्त्री यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, उद्याच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य, माझ्या भारताचं नील चित्र, स्वरणिम स्वप्न, २०४७ मध्ये भारत कसा घडेल? जगद्गुरु होऊ अस म्हटल्याने जगद्गुरु होत नसत जगद्गुरु, विश्वगुरू बनण्यासाठी आम्हाला एक पाथेय द्यावं लागेल ते पाथेय कोणत असेल तर ते आहे “सा विद्या या विमुक्तये” याच्या मध्ये संपूर्ण केंद्रीत झालेली माहिती. भारतात आतापर्यंत अनेक शिक्षण पद्धती आल्या आता नवीन शैक्षणिक धोरण आल पण ही सगळी धोरणच राहत गेली. निरूपण म्हणजे निश्चित स्वरूप असा शैक्षणिक आराखडा सरकारला दिला आहे. हे धोरण नाही तर आम्हाला दिर्घ कालीन नीती बनवायची आहे. म्हणून याला शैक्षणिक धोरण म्हणू नका याला राष्ट्रीय विद्या नीती २०२० असे म्हणा हे सगळं घडवून आणणार व्यासपीठ म्हणजे विद्या भारती आहे. असे त्यांनी आपल्या उद्बोधनात सांगितले.
विद्या भारती विदर्भ प्रांताचे अध्यक्ष डॉ. राम देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात भारतीय ज्ञान परंपरा जाणून घ्यायची असेल तर संस्कृत शिकण्याशिवाय पर्याय नाही. जगातल्या अनेक शास्त्रज्ञांनी, वैज्ञानिकांनी जे सिधांत मांडले. त्याला संस्कृतच्या ग्रंथांची पृष्ठभूमी आहे. आता सूर्य प्रकाशा इतक स्वच्छ झाल आहे असे सांगितले. बी आर हायस्कूल येथे संपन्न झालेल्या “सा विद्या या विमुक्तये” चे प्रकाशन सोहळ्याला उद्घाटन प्रसंगी संताजी कॉन्व्हेंटच्या विद्यार्थांनी गायलेल्या वंदनेने सर्वांना मंत्रमुग्ध केले. या प्रसंगी मंचावर विद्या भारती विदर्भ अध्यक्ष डॉ. राम देशमुख तर प्रमुख वक्ते म्हणून विदर्भातील प्रसिध्द वक्ते, विचारवंत, अभ्यासक, अध्ययनशील लेखक डॉ. कुमार शास्त्री, अकोला अर्बन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष दिलीप पांडे, विद्या भारतीचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठल खारोडे, महानगर अध्यक्ष मंगेश वानखडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन योगेश मल्लेकर व आभार गिरीश कानडे यांनी मानले. या कार्यक्रमाला केशव नगर सांस्कृतिक सभा नागपुरचे अध्यक्ष किशोर धाराशिवकर, सेठ बंसिधार विद्यालय एज्युकेशन सोसा. अध्यक्ष गोपालदास मल्ल, तेल्हारा, विद्या भारती विमर्श विषयाचे प्रमुख विद्यावाचस्पती दिलीप जोशी वाशिम, तसेच शहरातील शिक्षण प्रेमी, जेष्ठ व श्रेष्ठ गणमान्य नागरिक, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्या भारतीचे प्रांत उपाध्यक्ष सचिन जोशी, ताराताई हातवळणे, माधवी कुलकर्णी, रणदीप बिसने, शरद वाघ, आकांशा देशमुख, अंजली अग्निहोत्री, सागर तिवारी, अमृतेश अग्रवाल, भूषण बापट, डॉ आरती गोडबोले, महेश मोडक, डॉ. विक्रम जोशी, निलेश बनकर व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.
अकोला अर्बन एज्युकेशन सोसा. चे मोलाचे सहकार्य लाभले, योगेश मल्लेकर यांनी गायलेल्या वंदे मातरम् नी कार्यक्रमाची सांगता झाली.