Tuesday, January 21, 2025
HomeUncategorizedMahakumbh Mela : महाकुंभ मेळ्यात भीषण अग्नीतांडव : सिलिंडर स्फोटामुळे लागलेल्या आगीत...

Mahakumbh Mela : महाकुंभ मेळ्यात भीषण अग्नीतांडव : सिलिंडर स्फोटामुळे लागलेल्या आगीत १८ तंबू बेचिराख

अकोला दिव्य न्यूज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित करण्यात आलेल्या महाकुंभ मेळ्याला भीषण आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याकरता अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. या आगीचे लोट दूरहून दिसत आहेत. दरम्यान, घटनास्थळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पोहोचले असून ते घटनेची चौकशी करत आहेत. १८ तंबू जळून खाक : भाविक भक्तांच सामान बेचिराख प्राथमिक अहवालांनुसार, कॅम्प साइटवर आग लागली आणि त्या भागात बसवलेल्या अनेक तंबूंना या आगीने वेढले. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) चे एक पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. आग विझवण्यासाठी स्थानिक प्रशासन, पोलीस आणि अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. या आगीत १८ तंबूमध्ये वास्तव्यास असलेल्या भाविक भक्तांनी सोबत आणलेले साहित्य आणि सामान आगीत भस्मसात झाले आहे. यामध्ये घालावयाचे कपडेलत्ते आणि चादर सतरंज्या जळून नष्ट झाल्याने गैरसोय होत आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रमोद शर्मा इंडियन एक्स्प्रेसला म्हणाले, महाकुंभमध्ये सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागली आहे. तर, प्रयागराज झोनचे एडीजी भानू भास्कर इंडिया टुडेला म्हणाले, महाकुंभमेळ्याच्या सेक्टर १९ मध्ये दोन-तीन सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे कॅम्पमध्ये मोठी आग लागली. आगीवर नियंत्रण मिळण्यात आले आहे. सर्व लोक सुरक्षित आहेत आणि कोणीही जखमी झालेले नाही.

महाकुंभ २०२५ च्या अधिकृत X हँडलने पोस्ट केले, “खूप दुःखद! महाकुंभला लागलेल्या आगीच्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. प्रशासन तात्काळ मदत आणि बचाव कार्य करत आहे. आम्ही सर्वांच्या सुरक्षिततेसाठी माँ गंगाकडे प्रार्थना करतो. या पोस्टमध्ये बाधित भागातून काळ्या धुराचे दाट लोट उठत असलेला व्हिडिओ देखील शेअर करण्यात आला आहे.

महाकुंभमेळ्याच्या सेक्टर १९ मध्ये दोन सिलिंडरचा स्फोट होऊन शिबिरांमध्ये मोठी आग लागली. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे आखाडा पोलिस स्टेशनचे प्रभारी भास्कर मिश्रा यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!