Wednesday, January 22, 2025
HomeUncategorizedअकोला जिल्हा 'पालकमंत्री' आकाश फुंडकर ; कोणत्या जिल्ह्याचे कोण पालकमंत्री

अकोला जिल्हा ‘पालकमंत्री’ आकाश फुंडकर ; कोणत्या जिल्ह्याचे कोण पालकमंत्री

Maharashtra Guardian Minister List : अकोला दिव्य न्यूज : खामगाव विधानसभा मतदारसंघाचे सदस्य आकाश फुंडकर यांचा नवीन मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाल्याने अनेकांना जबर धक्का बसला.पण राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर अपेक्षित असल्याप्रमाणे अकोला जिल्हा पालकमंत्री पदाची जबाबदारी राज्याचे कामगार मंत्री आकाश भाऊसाहेब फुंडकर यांना देण्यात आली. अलिकडच्या काळात एकसंघ असलेल्या अकोला भाजपाला गटातटाचे ग्रहण लागले असून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी झाली. यामुळे भाजपला पराभव पत्करावा लागला. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पदाची जबाबदारी भाऊसाहेब फुंडकर यांचे पुत्र आमदार आकाश फुंडकर यांनाच देण्यात येईल असे अपेक्षित होते.

संग्रहित छायाचित्र

अलिकडच्या काही वर्षांपर्यंत खामगाव विधानसभा मतदारसंघ हा अकोला लोकसभा मतदारसंघात समाविष्ट होता. भाऊसाहेब फुंडकर यांनी अकोला लोकसभा मतदारसंघाचे सतत १० वर्षांपर्यंत प्रतिनिधित्व केले होते. भाऊसाहेब फुंडकर यांनी सर्वसमावेशक नेतृत्व करुन आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले होते. आजही जिल्ह्यात फुंडकर यांना मानणारा मोठा वर्ग असून, आकाश फुंडकर यांच्या माध्यमातून गटातटाचे राजकारण मोडित काढण्यासाठी हा एक मार्ग असल्याचे बोलल्या जात आहे.

महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप होऊन एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाल्यानंतर अखेर १८ जानेवारीला पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याच पालकमंत्रीपद असणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे आणि मुंबई शहरच तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्हा आणि बीड जिल्ह्याच पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे.

मंत्री धनंजय मुंडेंना धक्का
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेनंतर बीड जिल्ह्यात चांगलंच राजकारण तापलं होतं. यावरून धनंजय मुंडे यांना पालकमंत्रिपद देण्यास बीड जिल्ह्यातील आमदारांनी विरोध केला होता. त्यानंतर आता बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे देण्यात आलं आहे. तसेच मंत्री धनंजय मुंडे यांना या पालकमंत्रीपदाच्या यादीतून वगळण्यात आलं आहे.


क्र. जिल्हा. पालकमंत्रिपद
१. गडचिरोली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
२. ठाणे, मुंबई उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
३. पुणे, बीड उपमुख्यमंत्री अजित पवार
४. नागपूर,अमरावती चंद्रशेखर बावनकुळे
५ अहिल्या नगर राधाकृष्ण विखे पाटील
६ नाशिक गिरीश महाजन
७ वाशिम. हसन मुश्रीफ
८ सांगली चंद्रकांत पाटील
९ जळगाव. गुलाबराव पाटील
१० यवतमाळ. संजय राठोड
११ मुंबई उपनगर आशिष शेलार व मंगलप्रभातलोढा
१२. रत्नागिरी उदय सामंत
१३. धुळे जयकुमार रावल. १४ जालना पंकजा मुंडे
१५. नांदेड अतुल सावे
१६ चंद्रपूर अशोक ऊईके
१७ सातारा शंभुराजे देसाई
१८ रायगड अदिती तटकरे
१९. सिंधुदुर्ग. नितेश राणे
२० लातूर. शिवेंद्रसिंहराजे भोसले
२१ नंदुरबार माणिकराव कोकाटे
२२. सोलापूर ‌. जयकुमार गोरे
२३. हिंगोली नरहरी झिरवाळ
२४. भंडारा संजय सावकारे
२५. छत्रपती संभाजीनगर संजय शिरसाट
२६ धाराशीव प्रताप सरनाईक
२७. बुलढाणा मकरंद जाधव
२८ अकोला आकाश फुंडकर
२९ गोंदिया बाबासाहेब पाटील
३० कोल्हापूर प्रकाश आबिटकर,, माधुरी मिसाळ
३१ वर्धा पंकज भोयर
३२ परभणी. मेघना बोर्डीकर
३३ पालघर गणेश नाईक

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!