अकोला दिव्य न्यूज : विदर्भातील शैक्षणिक क्षेत्रातील ख्यातनाम अकोला शहरातील न्यु ईरा हायस्कूलच्या वर्ष १९७५ मधिल इयत्ता १० वीच्या तुकडीमधिल (बॅच) विद्यार्थ्यांनी शाळेतील आपला सुवर्ण महोत्सवी (१९७५-२०२५) वर्षाचा स्नेह मिलन सोहळा नुकताच वेदान्त लॉन्स येथे हर्षोल्लासात साजरा केला.
कार्यक्रमाचा आरंभ सरस्वती पूजन आणि दिप प्रज्वलन तत्कालीन शिक्षक आर.बी जोशी आणि पी.जी. जोशी सर (जळगांव) आणि मान्यवर तसेच माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते करून केले. कार्यक्रमाच्या सुरवातीला दिवंगत विद्यार्थ्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी आपला स्वतःचा परिचय करून देऊन सध्या करतं असलेल्या व्यवसाय किंवा करीत असलेल्या कार्याची माहिती दिली. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या न्यु इरा हायस्कूल मध्ये १९७५ मध्ये ज्या खोलीत इयत्ता १० वीचे वर्ग भरत होते. त्याच खोलीत ५० वर्षानंतर वर्ग भरवून शिक्षक पी.जी.जोशी सर यांनी वयाच्या ८५ वर्षात सर्वांना संबोधित केले.
संध्याकाळी विवीध सांस्कृतीक कार्यक्रमात अतुल कुळकर्णी यांनी बासुरी वादन तर भारतातील प्रसिध्द गिटार वादक संजय वेलंकीवर यांनी गिटारवर गाणे वाजविले आणि विद्यार्थीनी गाणे गायले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी संगीत संध्यांचा मनसोक्तपणे आनंद घेतला. सांस्कृतीक कार्यक्रमाचे संचालन माधव निलाखे यांनी केले. सकाळी प्रदिप नंद यांच्या नंद फॉर्म हाऊसमध्ये विवीध मनोरंजनाचे कार्यक्रम सादर केले. प्रदिप नंद व दिपाली नंद प्रकल्प यांच्या नवीन उपक्रम ‘दिपाज अँन्टिक एक्जीबिशन’ला भेट देऊन विविध जुन्या वस्तूंची पाहणी केली.
स्नेह संमेलनास अकोला, नागपुर, पुणे, मुंबई, बडोदरा, नाशिक तसेच अन्य राज्यातून विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थी, विद्यार्थीनी आपल्या पती वा पत्नीसह सहभागी झाले होते.