Friday, January 17, 2025
HomeUncategorizedदहशत ! 3 सख्खा भावांवर शस्त्राने हल्ला ; 2 सख्खा भावांचा जागीच...

दहशत ! 3 सख्खा भावांवर शस्त्राने हल्ला ; 2 सख्खा भावांचा जागीच मृत्यू

अकोला दिव्य न्यूज : तीन सख्खा भावांवर त्याच्याच समाजातील काही लोकांनी लोखंडी राॅड व धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात दोन सख्खा भावांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एक भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना अंभोरा पोलिस ठाणे हद्दीतील वाहिरा येथे काल गुरूवारी रात्री घडली.अजय विलास भोसले,भरत विलास भोसले असे मयताचे नावे असून कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी आहे.

आष्टी तालुक्यातील हातोळण येथील अजय विलास भोसले, भरत विलास भोसले, कृष्णा विलास भोसले हे तिघे भाऊ वाहिरा येथे गुरूवारी आले होते. याच ठिकाणी वाहिरा गावातील व बाहेरील काही लोक जमा झाले होते.गुरूवारी दुपारपासून हे सगळे याच ठिकाणी होते.रात्री साडे नऊ ते दहाच्या दरम्यान यातील काही लोकांनी या तीनही भावांवर लोंखडी राॅड, धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या हल्ल्यात अजय विलास भोसले, भरत विलास भोसले या दोन सख्खा भावांचा जागीच मृत्यू झाला. तर तिसरा भाऊ कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी झाला. असून त्याच्यावर अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत.

या घटनतेली सात संशयित आरोपीना अंभोरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.हा खून का व कोणत्या कारणावरुन केला हे अद्याप समजले नाही.दोनही मृतदेह आष्टी ग्रामीण रूग्णालयात ठेवण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!