Friday, January 17, 2025
HomeUncategorizedअकोला येथून महाकुंभ मेळाव्याला जाण्याकरीता विशेष रेल्वे

अकोला येथून महाकुंभ मेळाव्याला जाण्याकरीता विशेष रेल्वे

अकोला दिव्य न्यूज : उत्तर प्रदेश राज्यातील प्रयागराज येथील कुंभ मेळाव्याला जाण्याकरीता नांदेड-पटणा-नांदेड, औरंगाबाद-पटणा- औरंगाबाद, काचीगुडा-पटणा-काचीगुडा आणि सिकंदराबाद-पटणा-सिकंदराबाद विशेष रेल्वे प्रयागराज छिवकी मार्गे चालविण्यात येत आहेत.या रेल्वे अकोला रेल्वे स्थानकावरुन जाणार आहे.

  1. गाडी क्रमांक 07721 नांदेड ते पटणा ही विशेष गाडी नांदेड येथून दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी रात्री 23.00 वाजता सुटेल आणि पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापुर, खंडवा, इटारसी, पिपरिया,जबलपूर, काटणी, संटणा, माणिकपूर, प्रयागराज चौकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बकसर, आरा, दानापुर मार्गे पटणा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता पोहोचेल.
  2. गाडी क्रमांक 07722 पटणा ते नांदेड विशेष गाडी पटणा येथून दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी दुपारी 15.30 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच नांदेड येथे दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी 04.30 वाजता पोहोचेल. या गाडीत 22 डब्बे असतील.
  3. गाडी क्रमांक 07725 काचीगुडा ते पटणा मार्गे नांदेड ही विशेष गाडी काचीगुडा येथून दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी दुपारी 16:45 वाजता सुटेल आणि निजामाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापुर, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, काटणी, संटणा, माणिकपूर, प्रयागराज चौकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बकसर, आरा, दानापुर मार्गे पटणा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता पोहोचेल.
  4. गाडी क्रमांक 07726 पटणा ते काचीगुडा मार्गे नांदेड ही विशेष गाडी पटणा येथून दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच काचीगुडा येथे सकाळी 07:00 वाजता पोहोचेल.
  5. गाडी क्रमांक 07099 नांदेड ते पटणा ही विशेष गाडी नांदेड येथून दिनांक 13 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 23.00 वाजता सुटेल आणि पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापुर, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर,जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापुर मार्गे पटणा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता पोहोचेल.
  6. गाडी क्रमांक 07100 पटणा ते नांदेड विशेष गाडी पटणा येथून दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 15.30 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच नांदेड येथे दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 04.30 वाजता पोहोचेल. या गाडीत 22 डब्बे असतील.
  7. गाडी क्रमांक 07101 औरंगाबाद- पटणा ही विशेष गाडी औरंगाबाद येथून दिनांक 19 फेब्रुवारी 2025 आणि 25 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळ 19.00 वाजता सुटेल आणिजालना, सेलू ,परभणी,पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापुर, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर,जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापुर मार्गे पटणा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता पोहोचेल.
  8. गाडी क्रमांक 07102 पटणा ते औरंगाबाद विशेष गाडी पटणा येथून दिनांक 21 फेब्रुवारी 2025 आणि 27 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 15.30 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच औरंगाबाद येथे अनुक्रमे दिनांक 23 फेब्रुवारी 2025 आणि दिनांक 29 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 07.45 वाजता पोहोचेल. या गाडीत 22 डब्बे असतील.
  9. गाडी क्रमांक 07103 काचीगुडा ते पटणा मार्गे नांदेड ही विशेष गाडी काचीगुडा येथून दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 16:45 वाजता सुटेल आणि निजामाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापुर, खंडवा, , इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापुर मार्गे पटणा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता पोहोचेल.
  10. गाडी क्रमांक 07104 पटणा ते काचीगुडा मार्गे नांदेड ही विशेष गाडी पटणा येथून दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच काचीगुडा येथे दिनांक 26 फेब्रुवारी 2025 सकाळी 07:00 वाजता पोहोचेल. या गाडीत 22 डब्बे असतील.
  11. गाडी क्रमांक 07105 सिकंदराबाद ते पटणा मार्गे नांदेड ही विशेष गाडी सिकंदराबाद येथून दिनांक 07 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळ 17.00 वाजता सुटेल आणि निजामाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापुर, खंडवा, , इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापुर मार्गे पटणा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता पोहोचेल.
  12. गाडी क्रमांक 07106 पटणा ते सिकंदराबाद मार्गे नांदेड ही विशेष गाडी पटणा येथून दिनांक 09 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 15:30 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच सिकंदराबाद येथे दिनांक 11 फेब्रुवारी 2025 सकाळी 11:30 वाजता पोहोचेल. या गाडीत 20 डब्बे असतील.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!