Thursday, January 16, 2025
HomeUncategorizedअकोल्यात मोहल्ला क्लिनिंग ! नीलेश देव मित्र मंडळातर्फे अभियान १९ जानेवारीपासून

अकोल्यात मोहल्ला क्लिनिंग ! नीलेश देव मित्र मंडळातर्फे अभियान १९ जानेवारीपासून

अकोला दिव्य न्यूज : नवीन वर्षाच्या स्वागतासोबतच सामाजिक जाणीवेतून ॲड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प व नीलेश देव मित्र मंडळाच्या वतीने आणखी एक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी ‘मोहल्ला क्लिनिंग अभियान’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून या अभियानाची सुरुवात १९ जानेवारी रोजी सकाळी करण्यात येणार आहे.

अकोला शहराची कधीकाळी देशभरात ‘स्वच्छ आणि सुंदर शहर’ म्हणून ओळख होती. त्या काळात नगराध्यक्ष विनयकुमार पाराशर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील स्वच्छतेचे अनुकरणीय उदाहरण निर्माण झाले होते. अनेक महापालिका व नगरपालिकांचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी अकोल्याचा अभ्यास करण्यासाठी येथे येत असत. मात्र, काळाच्या ओघात शहराच्या या ओळखीवर ग्रहण लागले आहे. आज शहर दररोज हजारो टन कचरा व प्लास्टिक प्रदूषणाचा सामना करत असून, स्वच्छतेची दुरवस्था झाली आहे.

स्वच्छ आणि सुंदर अकोला पुन्हा निर्माण करण्याच्या उद्देशाने ॲड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प व नीलेश देव मित्र मंडळाने पुढाकार घेतला आहे. या मोहल्ला क्लिनिंग अभियानात महापालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाचे सहकार्य करीता आवाहन करण्यात आले आहे.

मोहल्ला क्लिनिंग अभियानात पर्यावरणप्रेमी नागरिक, सामाजिक व धार्मिक संस्थांनी सहभागी होण्यासाठी येत्या १९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ८ वाजता निलेश देव मित्र मंडळ कार्यालयात उपस्थित राहून शहराच्या स्वच्छतेसाठी सहभागी व्हावे, असे आवाहन नीलेश देव मित्र मंडळाचे सामाजिक कार्यकर्ते नीलेश रामकृष्ण देव यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!